बंद

    01.11.2026: भारतीय नौदलाच्या ‘सरगम २०२६’ ऑर्केस्ट्राला राज्यपालांची उपस्थिती

    प्रकाशित तारीख : November 2, 2026
    01.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील कुलाबा येथे  भारतीय नौदलाच्या सिम्फोनिक ऑर्केस्ट्राचा सांगीतिक कार्यक्रम सरगम २०२६ संपन्न झाला. भारतीय नौदलाच्या समृद्ध परंपरा आणि शौर्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात देशभक्तीपर संगीताचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. ऑर्केस्ट्राने हिंदुस्थानी फ्युजनसह विविध प्रकारच्या संगीत रचनांचे सादरीकरण केले. पश्चिम नौदल कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, व्हाइस ॲडमिरल राहुल विलास गोखले, वरिष्ठ नौदल अधिकारी, नौदलातील अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.  कमांडर विजय डी क्रुझ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांगितीक कार्यक्रम संपन्न झाला.

    भारतीय नौदलाच्या ‘सरगम २०२६’ ऑर्केस्ट्राला राज्यपालांची उपस्थिती

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील कुलाबा येथे भारतीय नौदलाच्या सिम्फोनिक ऑर्केस्ट्राचा सांगीतिक कार्यक्रम सरगम २०२६ संपन्न झाला.
    भारतीय नौदलाच्या समृद्ध परंपरा आणि शौर्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात देशभक्तीपर संगीताचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. ऑर्केस्ट्राने हिंदुस्थानी फ्युजनसह विविध प्रकारच्या संगीत रचनांचे सादरीकरण केले.
    पश्चिम नौदल कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, व्हाइस ॲडमिरल राहुल विलास गोखले, वरिष्ठ नौदल अधिकारी, नौदलातील अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
    कमांडर विजय डी क्रुझ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांगितीक कार्यक्रम संपन्न झाला.