बंद

    02.11.2026: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत लोकभवन येथे आठ राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा

    प्रकाशित तारीख : November 2, 2026
    02.11.2026 : एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोक भवन येथे आयोजित आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. त्यांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी. यू. एन. वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, उद्योगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे, निखत खान हेगडे, यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंह, अभिनेते पंकज बेरी, कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक, तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम,  आंध्रप्रदेशच्या पथकाने भथुकम्मा लोकनृत्य, छत्तीसगडच्या पथकाने लोकनृत्य, केरळच्या पथकाने काईकोट्टिकली, पंजाबच्या पथकाने भांगडा, कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य, दिल्लीच्या पथकाने कथ्थक कलाप्रकाराचे सादरीकरण केले. तर, मध्यप्रदेश, हरियाणा, लक्षद्वीप च्या पथकांनी लोकनृत्य सादर केले. अंदमान आणि निकोबार तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.  कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, उद्योजक नवीन हेगडे, नायिका रुपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंग, अभिनेता पंकज बेरी, यशपाल शर्मा, निखत खान हेगडे, साक्षी मादोलकर, वर्मा फाउंडेशनचे श्री वर्मा, यांच्यासह षण्मुखानंद नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी, नायर असोसिएशन, बोरीवलीचे सदस्य, अय्यप्पा मंदिर, एलआयसी कॉलनीचे सदस्य, कला विद्या संकुल महाविद्यालय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मल्याळम समाज नृत्यस्वर पथक, वर्मा फाउंडेशनचे प्रतिनिधी आदींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत लोकभवन येथे आठ राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा

    विविधता ही भारताची सर्वांत मोठी ताकद
    –राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. २ – भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता ही सर्वांत मोठी ताकद असून नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोक भवन येथे आयोजित आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. त्यांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारतातील राज्ये ही विविधरंगी सुंदर फुलांप्रमाणे असून त्यातून भारताचा भव्य पुष्पगुच्छ साकारला आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने देशाचा सामायिक सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मतभेदांच्या पलीकडे जाऊन परस्परांकडून शिकणे, विविधतेचा आदर करणे आणि समृद्ध, एकसंध भारताच्या उभारणीचा संकल्प करणे आवश्यक आहे.

    राज्यांच्या पुनर्रचनेच्या इतिहासाचा उल्लेख करून राज्यपालांनी सांगितले की, केंद्र शासनाने १९५३ मध्ये फजल अली आयोगाची नियुक्ती केली. आयोगाच्या शिफारशींनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यासह १४ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. पुढे १९६० मध्ये मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभाजन झाले, तर १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगढ़ राज्याची निर्मिती झाली.

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंध झाला. सरदार पटेल यांनी ‘एक भारत’ दिला असून त्याचे ‘श्रेष्ठ भारत’मध्ये रूपांतर करणे ही १४० कोटी भारतीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाला प्रेरणा देतो. विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करणे, भावनिक बंध दृढ करणे आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

    भारताला शतकानुशतके समान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाने जोडले आहे. आद्य शंकराचार्यांनी बद्रिकाश्रम, शृंगेरी, द्वारका आणि पुरी येथे आध्यात्मिक केंद्रे स्थापन करून विविध प्रदेशांतील सांस्कृतिक संबंध दृढ केले. संत नामदेवांनी महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचविला, तर दहावे शीख गुरू गोविंदसिंह यांनी आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे नांदेड येथे व्यतीत केली. स्वामी विवेकानंदांनीही भारतीयांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा दिली, असे राज्यपालांनी सांगितले.

    संघर्ष आणि हिंसाचाराचा सामना करणाऱ्या जगाला भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भूमीतून शांतता व प्रगतीचा मार्ग दाखविण्याची क्षमता आणि जबाबदारी भारताकडे आहे. त्यासाठी सर्वांनी भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन एकजुटीने उभे राहावे, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. त्यांनी सोहळ्यात गौरविण्यात आलेल्या मान्यवरांचे तसेच भारताची सांस्कृतिक विविधता सादरीकरणातून अधोरेखित करणाऱ्या विद्यार्थी, कलाकार, नृत्यदिग्दर्शक आणि सहभागी संस्थांचे अभिनंदन केले.

    यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी. यू. एन. वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, उद्योगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे, निखत खान हेगडे, यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंह, अभिनेते पंकज बेरी, कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    याप्रसंगी दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक, तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम, आंध्रप्रदेशच्या पथकाने भथुकम्मा लोकनृत्य, छत्तीसगडच्या पथकाने लोकनृत्य, केरळच्या पथकाने काईकोट्टिकली, पंजाबच्या पथकाने भांगडा, कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य, दिल्लीच्या पथकाने कथ्थक कलाप्रकाराचे सादरीकरण केले. तर, मध्यप्रदेश, हरियाणा, लक्षद्वीप च्या पथकांनी लोकनृत्य सादर केले. अंदमान आणि निकोबार तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.

    कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, उद्योजक नवीन हेगडे, नायिका रुपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंग, अभिनेता पंकज बेरी, यशपाल शर्मा, निखत खान हेगडे, साक्षी मादोलकर, वर्मा फाउंडेशनचे श्री वर्मा, यांच्यासह षण्मुखानंद नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी, नायर असोसिएशन, बोरीवलीचे सदस्य, अय्यप्पा मंदिर, एलआयसी कॉलनीचे सदस्य, कला विद्या संकुल महाविद्यालय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मल्याळम समाज नृत्यस्वर पथक, वर्मा फाउंडेशनचे प्रतिनिधी आदींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    00000

    ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल के अंतर्गत लोक भवन में आठ राज्यों एवं पाँच केंद्रशासित प्रदेशों का स्थापना दिवस समारोह आयोजित

    विविधता भारत की सबसे बड़ी शक्ति : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सांस्कृतिक आदान-प्रदान के माध्यम से राष्ट्रीय एकता को और सुदृढ़ बनाने का आह्वान

    मुंबई, 2 नवम्बर – भारत की भाषाएँ, रीति-रिवाज और परंपराएँ भले ही विविध हों, किंतु भारतीयता की भावना हम सभी को एक सूत्र में बाँधती है। देश की विविधता ही उसकी सबसे बड़ी शक्ति है। नागरिकों को देश के विभिन्न भागों की यात्रा कर वहाँ की संस्कृति का अनुभव करना चाहिए तथा स्थानीय लोगों से संवाद स्थापित करना चाहिए। ऐसे सांस्कृतिक आदान-प्रदान से राष्ट्रीय एकता और अधिक सुदृढ़ होगी। यह विचार महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने व्यक्त किए।

    राज्यपाल लोक भवन में ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल के अंतर्गत आयोजित आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, पंजाब और तमिलनाडु सहित आठ राज्यों तथा अंडमान एवं निकोबार द्वीप समूह, चंडीगढ़, दिल्ली, लक्षद्वीप और पुडुचेरी सहित पाँच केंद्रशासित प्रदेशों के स्थापना दिवस समारोह को संबोधित कर रहे थे। उन्होंने इन सभी राज्यों एवं केंद्रशासित प्रदेशों के नागरिकों को स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएँ दीं।

    राज्यपाल श्री वर्मा ने कहा कि भारत के राज्य विविध रंगों और सुगंधों वाले सुंदर पुष्पों के समान हैं, जिनसे भारत का भव्य पुष्पगुच्छ निर्मित होता है। प्रत्येक राज्य तथा केंद्रशासित प्रदेश ने देश की साझा सांस्कृतिक विरासत और राष्ट्रीय प्रगति में महत्वपूर्ण योगदान दिया है। मतभेदों से ऊपर उठकर एक-दूसरे से सीखना, विविधता का सम्मान करना तथा समृद्ध और एकीकृत भारत के निर्माण का संकल्प लेना समय की आवश्यकता है।

    राज्यों के पुनर्गठन के इतिहास का उल्लेख करते हुए राज्यपाल ने कहा कि केंद्र सरकार ने वर्ष 1953 में फज़ल अली आयोग का गठन किया था। आयोग की सिफारिशों के आधार पर 1 नवम्बर 1956 को द्विभाषी मुंबई राज्य सहित 14 राज्यों और 6 केंद्रशासित प्रदेशों का गठन हुआ। बाद में वर्ष 1960 में मुंबई राज्य का विभाजन कर महाराष्ट्र और गुजरात राज्यों का निर्माण किया गया तथा 1 नवम्बर 2000 को छत्तीसगढ़ राज्य अस्तित्व में आया।

    उन्होंने कहा कि सरदार वल्लभभाई पटेल के नेतृत्व में देश का राजनीतिक एकीकरण संभव हुआ। सरदार पटेल ने हमें ‘एक भारत’ प्रदान किया और उसे ‘श्रेष्ठ भारत’ में परिवर्तित करना 140 करोड़ भारतीयों की सामूहिक जिम्मेदारी है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की इसी प्रेरणा से ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल संचालित की जा रही है। इस पहल का उद्देश्य विविधता में एकता का उत्सव मनाना, भावनात्मक संबंधों को सुदृढ़ करना तथा देश की समृद्ध सांस्कृतिक विरासत के प्रति जागरूकता बढ़ाना है।

    राज्यपाल ने कहा कि भारत सदियों से अपनी साझा सांस्कृतिक एवं आध्यात्मिक विरासत से जुड़ा हुआ है। आदि शंकराचार्य ने बद्रीनाथ, श्रृंगेरी, द्वारका और पुरी में आध्यात्मिक केंद्र स्थापित कर विभिन्न क्षेत्रों के मध्य सांस्कृतिक संबंधों को सुदृढ़ किया। संत नामदेव ने महाराष्ट्र से पंजाब तक भक्ति का संदेश पहुँचाया, जबकि दसवें सिख गुरु गुरु गोबिंद सिंह ने अपने जीवन के अंतिम वर्ष नांदेड़ में बिताए। स्वामी विवेकानंद ने भी भारतीयों को अपनी सांस्कृतिक विरासत पर गर्व करने की प्रेरणा दी।

    राज्यपाल ने कहा कि संघर्ष और हिंसा से जूझ रही दुनिया को भगवान महावीर, भगवान बुद्ध और महात्मा गांधी की भूमि भारत से शांति, सह-अस्तित्व और प्रगति का मार्ग मिल सकता है। इसके लिए सभी को भेदभाव और विभाजन से ऊपर उठकर एकजुट होकर कार्य करना होगा।

    राज्यपाल ने समारोह में सम्मानित सभी विशिष्ट अतिथियों तथा भारत की सांस्कृतिक विविधता को प्रस्तुत करने वाले विद्यार्थियों, कलाकारों, नृत्य-निर्देशकों और सहभागी संस्थाओं को बधाई दी।

    इस अवसर पर वर्मा फाउंडेशन के संस्थापक पी. यू. एन. वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय की कुलपति डॉ. अपूर्वा पालकर, उद्योगपति एवं अभियांत्रिकी विशेषज्ञ नवीन हेगड़े, निखत खान हेगड़े, अभिनेता यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, पहलवान संग्राम सिंह, अभिनेता पंकज बेरी, कैप्टन गोपीचंद थोटाकुरा, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तथा विभिन्न शैक्षणिक, सामाजिक एवं सांस्कृतिक संस्थाओं के प्रतिनिधि उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन वर्मा फाउंडेशन द्वारा किया गया।

    कार्यक्रम के दौरान दिव्यम शरण गुप्ता ने कालभैरव अष्टकम् प्रस्तुत किया। तमिलनाडु के कलाकारों ने भरतनाट्यम, आंध्र प्रदेश के दल ने बथुकम्मा लोकनृत्य, छत्तीसगढ़ के दल ने लोकनृत्य, केरल के दल ने कैकोट्टिकली, पंजाब के दल ने भांगड़ा, कर्नाटक के दल ने तुलु पद्य तथा दिल्ली के दल ने कथक की प्रभावशाली प्रस्तुतियाँ दीं। वहीं मध्य प्रदेश, हरियाणा और लक्षद्वीप के दलों ने भी लोकनृत्य प्रस्तुत किए। अंडमान एवं निकोबार द्वीप समूह तथा पुडुचेरी पर आधारित वृत्तचित्र भी प्रदर्शित किए गए।

    इस अवसर पर कैप्टन गोपीचंद थोटाकुरा, नवीन हेगड़े, रूपाली गांगुली, संग्राम सिंह, पंकज बेरी, यशपाल शर्मा, निखत खान हेगड़े, साक्षी मादोलकर तथा पी. यू. एन. वर्मा सहित षण्मुखानंद नाट्य विद्यालय, नायर एसोसिएशन (बोरीवली), अयप्पा मंदिर-एलआईसी कॉलोनी, कला विद्या संकुल महाविद्यालय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय, मलयालम समाज नृत्यस्वर दल तथा वर्मा फाउंडेशन के प्रतिनिधियों का राज्यपाल के हस्तों सम्मान किया गया।
    00000