02.11.2026: डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट; ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा
डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट; ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा
डेन्मार्कचे व्यवसाय आणि स्पर्धात्मकता मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी आज एका शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
डेन्मार्कमधील लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी मर्स्कसह डेन्मार्कच्या ६३ कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत असल्याची माहिती मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी राज्यपालांना दिली. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात होणाऱ्या मुक्त व्यापार कराराचा महाराष्ट्राला मोठा लाभ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भारत आणि डेन्मार्क यांच्यात हरित धोरणात्मक भागीदारी असून त्यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जीवन विज्ञान या क्षेत्रांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपीय महासंघ हा जगातील सर्वात मोठा ऊर्जा आयातदार असल्याचे नमूद करून भारत आणि डेन्मार्क यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविण्याबाबत त्यांनी विशेष स्वारस्य व्यक्त केले.
डेन्मार्क हा आकाराने लहान मात्र समृद्ध देश असल्याचे सांगताना तेथील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी तुलनेने कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. डेन्मार्कच्या अर्थव्यवस्थेत भारतीय वंशाच्या नागरिकांचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
डेन्मार्कच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारताने शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची माहिती दिली.
यावेळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन; आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाच्या उपस्थायी सचिव टिने नील्सन हर्ट्झ; उपमिशन प्रमुख मार्टिन एग्नुड पीटर्सन; मंत्र्यांचे विशेष सल्लागार ख्रिस्तोफर लेहमन; समुपदेशक जोसेफिन इव्हा लिली पॅलेसन; प्रथम सचिव मॅथियास एमिल बेंटसन; मंत्र्यांच्या खासगी सचिव अमाली रोझेनबेक क्रिस्टियनसेन; तसेच विभागप्रमुख विनोथा थियागराज आणि स्टेफन ल्यूक पीटर्सन यांचा समावेश होता.
**
डेनमार्क के मंत्री ने महाराष्ट्र के राज्यपाल से की मुलाकात; ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता और शिक्षा के क्षेत्र में सहयोग पर चर्चा
डेनमार्क के व्यवसाय एवं प्रतिस्पर्धात्मकता मंत्री मार्टिन लिडेगार्ड ने आज एक प्रतिनिधिमंडल के साथ महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा से लोक भवन, मुंबई में शिष्टाचार भेंट की।
मंत्री मार्टिन लिडेगार्ड ने राज्यपाल को बताया कि डेनमार्क की लॉजिस्टिक्स क्षेत्र की अग्रणी कंपनी मर्स्क सहित डेनमार्क की ६३ कंपनियां महाराष्ट्र में कार्यरत हैं। उन्होंने आशा व्यक्त की कि भारत और यूरोपीय संघ के बीच प्रस्तावित मुक्त व्यापार समझौते से महाराष्ट्र को व्यापक लाभ होगा।
उन्होंने बताया कि भारत और डेनमार्क के बीच हरित रणनीतिक साझेदारी है, जिसमें पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हरित हाइड्रोजन और जीवन विज्ञान जैसे क्षेत्र शामिल हैं।
यूरोपीय संघ को विश्व का सबसे बड़ा ऊर्जा आयातक क्षेत्र बताते हुए उन्होंने कहा कि भारत और डेनमार्क के बीच ऊर्जा क्षेत्र में सहयोग की व्यापक संभावनाएं हैं। उन्होंने शिक्षा और कृत्रिम बुद्धिमत्ता के क्षेत्र में भी सहयोग बढ़ाने में विशेष रुचि व्यक्त की।
डेनमार्क को आकार में छोटा, लेकिन समृद्ध देश बताते हुए उन्होंने कहा कि वहां अमीर और गरीब के बीच आर्थिक असमानता अपेक्षाकृत कम है। उन्होंने डेनमार्क की अर्थव्यवस्था में भारतीय मूल के लोगों के महत्वपूर्ण योगदान की भी सराहना की।
डेनमार्क के प्रतिनिधिमंडल का महाराष्ट्र में स्वागत करते हुए राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने भारत द्वारा शिक्षा, कौशल विकास, डिजिटल लेन-देन और कृत्रिम बुद्धिमत्ता के क्षेत्र में की गई प्रगति की जानकारी दी।
इस अवसर पर डेनमार्क के भारत में राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेंसेन; अंतरराष्ट्रीय व्यवसाय विभाग की उप स्थायी सचिव टिने नील्सन हर्ट्ज; उप मिशन प्रमुख मार्टिन एग्नुड पीटर्सन; मंत्री के विशेष सलाहकार क्रिस्टोफर लेहमन; काउंसलर जोसेफिन इवा लिली पल्लेसन; प्रथम सचिव मैथियास एमिल बेंटसन; मंत्री की निजी सचिव अमाली रोसेनबेक क्रिश्चियन्सेन तथा विभाग प्रमुख विनोथा थियागराज और स्टेफन ल्यूक पीटर्सन उपस्थित थे।
**