03.11.2026 ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी २०४७ चा सर्वंकष विकास आराखडा तयार करा – राज्यपाल
03.11.2026
ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी २०४७ चा सर्वंकष विकास आराखडा तयार करा
– राज्यपाल जिष्णु देव वर्मा
ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
मुंबईत दरवर्षी महिनाभराचा ‘महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करण्याची राज्यपालांची सूचना
पुढील वर्षापासून पुरस्कारांची रक्कम दुप्पट करणार
– उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ३ : ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्ये, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी उपयोग करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेशी सुसंगत असा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. लोकभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध जिल्ह्यांतील यशस्वी ग्रामोद्योग उद्योजकांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले.
ग्रामीण उद्योजकांनी पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या उद्योगांचा विस्तार करावा. त्यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
मंडळाच्या ‘मधाचे गाव’ या उपक्रमाचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. महागाव आणि कडगावच्या धर्तीवर राज्यातील आणखी दहा गावांचा ‘मधाचे गाव’ म्हणून विकास करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने सुमारे ५ कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मधमाशीपालन आणि मध उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. या उपक्रमाच्या यशस्वी विस्तारासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, मध प्रक्रिया, पॅकेजिंग आणि विपणन सुविधांवर विशेष भर द्यावा, असेही त्यांनी सुचविले.
खादीचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खादी उत्पादने अधिक दर्जेदार, आकर्षक आणि स्पर्धात्मक बनविण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. मुंबईत दरवर्षी महिनाभराचा ‘महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करावा. या महोत्सवात उत्पादन प्रदर्शन, फॅशन शो तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करावे. विमानतळांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करावे. यामुळे स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
महिला, युवक, पारंपरिक कारागीर आणि वंचित घटकांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने तेथील स्थानिक कौशल्ये आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांवर आधारित उद्योग विकसित करावेत. २०४७ पर्यंत समृद्ध गावे, कुशल कारागीर, सक्षम महिला आणि आत्मनिर्भर युवा उद्योजक घडविण्याचे निश्चित उद्दिष्ट ठेवून मंडळाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामोद्योग भरारी पुरस्कारांची रक्कम पुढील वर्षापासून दुप्पट
– उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढील वर्षापासून ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कारां’च्या रोख पारितोषिकांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
केवळ पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन अवघ्या दोन ते तीन वर्षांत २५ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकाची यशोगाथा प्रेरणादायी आहे. अशा यशस्वी उद्योजकांना खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ बनविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. राज्यात गुंतवणूक प्रस्तावांच्या अंमलबजावणीचे प्रमाणही अधिक आहे. औद्योगिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने तंत्ररत्न, पीएम विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नवउद्योजक आणि स्टार्टअप निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही डॉ. सामंत यांनी सांगितले.
यशस्वी उद्योजकांच्या कथा राज्यभर पोहोचविणार
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार’ योजनेची भूमिका स्पष्ट करताना मंडळाचे सभापती रवींद्र साठे म्हणाले की, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या तसेच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे.
महात्मा गांधी यांच्या स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात स्वयंरोजगार आणि उद्योगनिर्मितीला चालना मिळणे आवश्यक आहे. यंदा ११ उद्योजकांचा गौरव करण्यात येत असून, त्यांच्या यशोगाथांचे पुस्तक प्रकाशित करून राज्यभर पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त उद्योजकांचा गौरव
सन २०२५ चे पुरस्कार : ठाणे जिल्ह्यातील ‘प्रगत महिला गृह उद्योग’च्या रक्षा रमेश वागे यांना प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ‘लक्ष्मी कॅशू’ (काजू बी प्रक्रिया) उद्योगाचे संदेश परशुराम दळवी यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये, तर धुळे जिल्ह्यातील ‘सारवा इलेक्ट्रेक’ (मशीन मॅन्युफॅक्चरिंग) उद्योगाचे दर्शन गोपालदास यादव यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.
उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील ‘जागृती हळद पावडर’ उद्योगाच्या संगीता लालासो भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘स्वयंम संयुक्त देयता समूह’ (फळ व फूल प्रक्रिया उत्पादन) उद्योगाच्या मिनल सचिन देसाई, नाशिक जिल्ह्यातील ‘व्यंकटेश आर्टर्स स्टुडिओ’ (मूर्तीकाम) उद्योगाचे विष्णू मोतीराम पवार आणि वाशिम जिल्ह्यातील ‘जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’चे कृष्णा ज्ञानबा चौधरी यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२६ चे पुरस्कार : अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ब्राह्मणनाथ फार्मा’ उद्योगाचे पारस दिलीप गोलेचा यांना प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, पुणे जिल्ह्यातील ‘बारामती इको सिस्टम’ उद्योगाच्या तेजल अभिमन्यू नागवडे यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये, तर सांगली जिल्ह्यातील ‘मंगलमूर्ती फूड इंडस्ट्रीज’चे हर्षद नामदेव सुवर्णवंशी यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील ‘वैभव क्रिएशन’ (मूर्तीकाम) उद्योगाचे वैभव सुभाषराव मानकर यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, अपर जिल्हाधिकारी तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
००००
Press Release made by Shri. Gajanan Patil, DGIPR
ग्रामीण उद्यमिता को प्रोत्साहन देने हेतु वर्ष 2047 तक का समग्र विकास रोडमैप तैयार किया जाए
– राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपाल के करकमलों से ‘ग्रामोद्योग भरारी सम्मान पुरस्कार’ प्रदान
मुंबई में प्रतिवर्ष एक माह का ‘महाराष्ट्र खादी एवं ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करने का राज्यपाल का सुझाव
अगले वर्ष से पुरस्कार राशि दोगुनी की जाएगी
– उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, 3 नवंबर : महाराष्ट्र के राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा ने महाराष्ट्र राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल से आह्वान किया कि ग्रामीण क्षेत्रों में उपलब्ध पारंपरिक कौशल, प्राकृतिक संसाधनों तथा उद्यमशीलता की संभावनाओं का प्रभावी उपयोग करते हुए रोजगार सृजन को गति देने तथा ग्रामीण अर्थव्यवस्था को सशक्त बनाने के लिए ‘विकसित भारत 2047’ की संकल्पना के अनुरूप एक समग्र एवं दूरदर्शी विकास रोडमैप तैयार किया जाए।
राज्यपाल ‘ग्रामोद्योग भरारी सम्मान पुरस्कार 2025 एवं 2026’ वितरण समारोह को संबोधित कर रहे थे। महाराष्ट्र राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल द्वारा लोक भवन में आयोजित इस समारोह में राज्यपाल ने राज्य के विभिन्न जिलों के सफल ग्रामोद्योग उद्यमियों को सम्मानित किया। ग्रामीण उद्यमिता को बढ़ावा देने के लिए मंडल द्वारा किए जा रहे कार्यों की सराहना करते हुए उन्होंने पुरस्कार प्राप्त उद्यमियों को बधाई दी।
राज्यपाल ने कहा कि ग्रामीण उद्यमियों को पारंपरिक कौशल के साथ आधुनिक तकनीक का समन्वय करते हुए अपने उद्योगों का विस्तार करना चाहिए तथा अधिकाधिक रोजगार के अवसर सृजित करने चाहिए। उन्होंने प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (PMEGP), पीएम विश्वकर्मा योजना तथा मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम जैसी योजनाओं के माध्यम से नए उद्यमियों को प्रोत्साहन देने पर बल दिया।
राज्यपाल ने मंडल की ‘हनी विलेज’ (मध का गांव) पहल की विशेष सराहना की। उन्होंने कहा कि महागांव और कडगांव की तर्ज पर राज्य के दस अन्य गांवों को भी ‘मध का गांव’ के रूप में विकसित किया जा रहा है, जिसके लिए राज्य सरकार द्वारा लगभग 5 करोड़ 2 लाख रुपये का प्रावधान किया गया है। मधुमक्खी पालन और शहद उत्पादन से किसानों की आय में वृद्धि होने के साथ-साथ ग्रामीण क्षेत्रों में रोजगार के नए अवसर भी सृजित होंगे। उन्होंने इस पहल के सफल विस्तार के लिए वैज्ञानिक प्रशिक्षण, शहद प्रसंस्करण, पैकेजिंग तथा विपणन सुविधाओं को सुदृढ़ बनाने की आवश्यकता पर भी जोर दिया।
राज्यपाल ने कहा कि खादी की ऐतिहासिक विरासत को संरक्षित रखते हुए आधुनिक उपभोक्ताओं की रुचि और आवश्यकताओं के अनुरूप खादी उत्पादों को अधिक गुणवत्तापूर्ण, आकर्षक और प्रतिस्पर्धी बनाया जाना चाहिए। उन्होंने सुझाव दिया कि मुंबई में प्रतिवर्ष एक माह का ‘महाराष्ट्र खादी एवं ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित किया जाए। इस महोत्सव में उत्पाद प्रदर्शनियों, फैशन शो तथा क्रेता-विक्रेता सम्मेलनों का आयोजन किया जाना चाहिए। इसके साथ ही हवाई अड्डों जैसे प्रमुख स्थानों पर खादी एवं ग्रामोद्योग उत्पादों के स्थायी बिक्री केंद्र स्थापित किए जाएं तथा एक स्वतंत्र डिजिटल विपणन मंच विकसित किया जाए। इससे स्थानीय उत्पादकों को राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय बाजारों तक पहुंच बनाने में सहायता मिलेगी।
राज्यपाल ने महिलाओं, युवाओं, पारंपरिक कारीगरों तथा वंचित वर्गों को उद्यमिता की मुख्यधारा से जोड़ने के लिए विशेष प्रयास किए जाने की आवश्यकता पर बल दिया। उन्होंने कहा कि राज्य के प्रत्येक जिले में वहां उपलब्ध स्थानीय कौशल और प्राकृतिक संसाधनों पर आधारित उद्योगों का विकास किया जाना चाहिए। वर्ष 2047 तक समृद्ध गांव, कुशल कारीगर, सशक्त महिलाएं तथा आत्मनिर्भर युवा उद्यमियों का निर्माण करने का स्पष्ट लक्ष्य निर्धारित कर मंडल को कार्य करना चाहिए।
अगले वर्ष से ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ की राशि दोगुनी होगी
– उद्योग मंत्री उदय सामंत
उद्योग मंत्री श्री उदय सामंत ने घोषणा की कि खादी एवं ग्रामोद्योग क्षेत्र के उद्यमियों को अधिक प्रोत्साहन प्रदान करने के उद्देश्य से अगले वर्ष से ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ की नकद पुरस्कार राशि दोगुनी कर दी जाएगी।
उन्होंने कहा कि केवल पांच लाख रुपये का ऋण लेकर दो से तीन वर्षों में 25 करोड़ रुपये का कारोबार स्थापित करने वाले उद्यमी की सफलता अत्यंत प्रेरणादायक है। ऐसे सफल उद्यमियों को खादी एवं ग्रामोद्योग क्षेत्र का ब्रांड एंबेसडर बनाया जाना चाहिए।
श्री सामंत ने कहा कि महाराष्ट्र प्रत्यक्ष विदेशी निवेश (एफडीआई), सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम (एमएसएमई) तथा स्टार्टअप क्षेत्र में देश के अग्रणी राज्यों में शामिल है। राज्य में निवेश प्रस्तावों के क्रियान्वयन की दर भी उल्लेखनीय है। उन्होंने कहा कि औद्योगिक विकास को और अधिक गति देने के लिए खादी एवं ग्रामोद्योग मंडल को तंत्ररत्न, पीएम विश्वकर्मा तथा मुख्यमंत्री रोजगार सृजन योजनाओं के माध्यम से अधिकाधिक नए उद्यमियों और स्टार्टअप्स के निर्माण पर विशेष ध्यान देना चाहिए।
सफल उद्यमियों की प्रेरक कहानियां पूरे राज्य तक पहुंचाई जाएंगी
महाराष्ट्र राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल के अध्यक्ष रवींद्र साठे ने वर्ष 2023 से प्रारंभ की गई ‘ग्रामोद्योग भरारी सम्मान पुरस्कार’ योजना के उद्देश्य पर प्रकाश डालते हुए कहा कि प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम तथा मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम जैसी सरकारी योजनाओं का लाभ लेकर सफल उद्योग स्थापित करने वाले तथा अन्य लोगों को रोजगार उपलब्ध कराने वाले उद्यमियों को प्रोत्साहन और सम्मान प्रदान करने के लिए यह योजना शुरू की गई है।
उन्होंने कहा कि महात्मा गांधी के आत्मनिर्भर ग्रामों के विचार के अनुरूप ग्रामीण क्षेत्रों में स्वरोजगार और उद्योग सृजन को बढ़ावा देना अत्यंत आवश्यक है। इस वर्ष 11 उद्यमियों को सम्मानित किया जा रहा है तथा उनकी सफलता की प्रेरक गाथाओं पर आधारित एक पुस्तक प्रकाशित कर राज्यभर में पहुंचाई जाएगी।
पुरस्कार प्राप्त उद्यमियों का सम्मान
वर्ष 2025
प्रथम पुरस्कार (₹15,000) : रक्षा रमेश वागे, प्रगत महिला गृह उद्योग, जिला ठाणे।
द्वितीय पुरस्कार (₹10,000) : संदेश परशुराम दळवी, लक्ष्मी काजू (काजू प्रसंस्करण उद्योग), जिला रत्नागिरी।
तृतीय पुरस्कार (₹7,000) : दर्शन गोपालदास यादव, सारवा इलेक्ट्रेक (मशीन निर्माण उद्योग), जिला धुले।
प्रोत्साहन पुरस्कार : संगीता लालासो भोसले (जागृति हल्दी पाउडर उद्योग, सांगली), मीनल सचिन देसाई (स्वयंम संयुक्त देयता समूह, फल एवं पुष्प प्रसंस्करण, सिंधुदुर्ग), विष्णु मोतीराम पवार (व्यंकटेश आर्टर्स स्टूडियो, मूर्तिकला, नासिक) तथा कृष्णा ज्ञानबा चौधरी (जिजाऊ मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज, वाशिम) को स्मृति-चिह्न एवं प्रशस्ति-पत्र प्रदान कर सम्मानित किया गया।
वर्ष 2026
प्रथम पुरस्कार (₹15,000) : पारस दिलीप गोलेचा, ब्राह्मणनाथ फार्मा, जिला अहिल्यानगर।
द्वितीय पुरस्कार (₹10,000) : तेजल अभिमन्यु नागवडे, बारामती इको सिस्टम, जिला पुणे।
तृतीय पुरस्कार (₹7,000) : हर्षद नामदेव सुवर्णवंशी, मंगलमूर्ति फूड इंडस्ट्रीज, जिला सांगली।
प्रोत्साहन पुरस्कार : वैभव सुभाषराव मानकर, वैभव क्रिएशन (मूर्तिकला उद्योग), जिला अमरावती को स्मृति-चिह्न एवं प्रशस्ति-पत्र प्रदान कर सम्मानित किया गया।
इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम आयुक्त तथा एमएसएसआईडीसी की प्रबंध निदेशक सुश्री प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल के मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, अपर जिलाधिकारी तथा सह-मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
0000