05.10.2026: राज्यपालांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे प्रकाशन
राज्यपालांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे प्रकाशन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित ५ पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी (दि. ५ ऑक्टो.) लोकभवन येथे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
राज्यपालांच्या हस्ते तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू) लिखित ‘संत रविदास म्हणे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
राज्यपालांच्या हस्ते मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन आणि चिंतन’, ‘अण्णाभाऊ साठे : आकलन आणि आस्वाद’ व ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय डॉ बळीराम गायकवाड, डॉ माणिक सोनावणे व डॉ धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांनी संपादित केलेल्या ‘अण्णाभाऊ साठे : अ ट्रान्सनॅशनल लिटररी लेगसी’ या इंग्रजी पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यपालांनी लिखाण हा समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे सांगितले. महान व्यक्तींवरील लिखाणाच्या माध्यमातून त्यांचे विचार व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होते असे राज्यपालांनी सांगितले.
साहित्याचा अंतिम उद्देश समाजात एकोपा निर्माण करणे आणि जीवन उन्नत करणे हा आहे. भारतातील संत परंपरा ही समानतेची चळवळ होती. मात्र, या चळवळीच्या योगदानाची इतिहासात पुरेशी नोंद झालेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
साहित्य विविध भाषा आणि पिढ्यांना जोडण्याचे कार्य करते, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, काळाच्या ओघात लोक चित्रपट कलाकार आणि राजकारण्यांना विसरतील; परंतु महान लेखक आणि कवींना विसरत नाहीत. कालिदास, मुन्शी प्रेमचंद आणि शेक्सपिअर यांच्या साहित्यकृती आजही जिवंत आहेत, कारण उत्तम लेखन मन आणि हृदय या दोन्हींना स्पर्श करते, असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्राला समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. चांगल्या साहित्याचा आजही समाजाकडून आदर केला जातो असे सांगताना राज्यपालांनी फुलांऐवजी पुस्तके भेट द्यावेत असे आवाहन केले. फुले कोमेजून जातात; मात्र एखादे पुस्तक कुणीतरी, कुठेतरी आणि कधीही वाचू शकते. त्या पुस्तकातील दोन पाने जरी वाचली, तरी त्याचा वाचकाच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.
लेखन हे लेखकांच्या विचारांना आणि कल्पनांना पंख देण्याचे कार्य करते. त्यामध्ये प्रेरणा देण्याची आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे. त्यामुळे लेखन आणि लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच आपला समृद्ध साहित्यिक वारसा जतन करून तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, विष्णु वझे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आदी उपस्थित होते.
*****
राज्यपाल के हाथों संत रविदास और अण्णा भाऊ साठे के जीवन एवं साहित्य पर आधारित 5 पुस्तकों का प्रकाशन
मुंबई, 5 अक्टूबर : महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा के हाथों संत रविदास और साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे के जीवन एवं साहित्य पर आधारित पांच पुस्तकों का प्रकाशन सोमवार (5 अक्टूबर) को लोकभवन में चुनिंदा आमंत्रितों की उपस्थिति में संपन्न हुआ।
राज्यपाल के हाथों तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू) द्वारा लिखित ‘संत रविदास म्हणे’ पुस्तक का प्रकाशन किया गया।
इस अवसर पर मातंग साहित्य परिषद के अध्यक्ष डॉ. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे द्वारा संपादित ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन और चिंतन’, ‘अण्णाभाऊ साठे : आकलन और आस्वाद’ तथा ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) इन तीन पुस्तकों का भी राज्यपाल के हाथों प्रकाशन किया गया। इसके अलावा डॉ. बळीराम गायकवाड़, डॉ. माणिक सोनावणे और डॉ. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे द्वारा संपादित अंग्रेजी पुस्तक ‘अण्णाभाऊ साठे : अ ट्रांसनैशनल लिटरेरी लेगेसी’ का भी प्रकाशन किया गया।
इस अवसर पर बोलते हुए राज्यपाल ने कहा कि लेखन समाज में परिवर्तन लाने का एक महत्वपूर्ण माध्यम है। महान व्यक्तित्वों के जीवन और कार्य पर लिखने से उनके विचारों और मूल्यों को नई पीढ़ी तक पहुंचाने का कार्य होता है।
राज्यपाल ने कहा कि साहित्य का अंतिम उद्देश्य समाज में एकता और सद्भाव को बढ़ावा देना तथा जीवन को बेहतर बनाना है। भारत की संत परंपरा समानता की एक महत्वपूर्ण सामाजिक चळवळ थी। हालांकि, इस आंदोलन के योगदान का इतिहास में पर्याप्त दस्तावेजीकरण नहीं हुआ है, ऐसा उन्होंने कहा।
भारत में संत परंपरा अत्यंत समृद्ध और विविध रही है। महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर और संत तुकाराम जैसे महान संत हुए। बंगाल में चैतन्य महाप्रभु और असम में भी समृद्ध भक्ति परंपरा विकसित हुई। संत परंपरा के केंद्र में समानता का संदेश था। संतों ने सिखाया कि समाज के प्रत्येक व्यक्ति का अपना महत्व और योगदान है।
साहित्य विभिन्न भाषाओं और पीढ़ियों को जोड़ने का कार्य करता है, ऐसा बताते हुए राज्यपाल ने कहा कि समय के साथ लोग फिल्मी कलाकारों और राजनेताओं को भूल सकते हैं, लेकिन महान लेखकों और कवियों को नहीं भूलते। कालिदास, मुंशी प्रेमचंद और शेक्सपियर की रचनाएं आज भी प्रासंगिक हैं, क्योंकि अच्छा लेखन मन और हृदय दोनों को स्पर्श करता है।
राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र को समृद्ध साहित्यिक और सांस्कृतिक परंपरा विरासत में मिली है। अच्छे साहित्य का आज भी समाज में सम्मान है। उन्होंने लोगों से फूलों के बजाय पुस्तकें भेंट करने का आह्वान किया। फूल मुरझा जाते हैं, लेकिन एक पुस्तक को कोई न कोई व्यक्ति, कहीं न कहीं और कभी भी पढ़ सकता है। पुस्तक के केवल दो पृष्ठ पढ़ने से भी पाठक के विचारों पर प्रभाव पड़ सकता है।
लेखन लेखकों के विचारों और कल्पनाओं को पंख देता है। इसमें प्रेरणा देने और सामाजिक परिवर्तन लाने की शक्ति है। इसलिए लेखन और लेखकों को प्रोत्साहित किया जाना चाहिए। साथ ही, हमारी समृद्ध साहित्यिक विरासत को संरक्षित कर उसे भावी पीढ़ियों तक पहुंचाया जाना चाहिए, ऐसा राज्यपाल ने कहा।
पुस्तक प्रकाशन समारोह में पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मुंबई विश्वविद्यालय के कुलपति प्रो. रवींद्र कुलकर्णी, विष्णु वझे, आर्टी के प्रबंध निदेशक सुनील वारे सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।