बंद

    17.10.2026 : बोरिवली येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये दिव्यांगांच्या ‘मिट्टी कॅफे’चे उदघाटन

    प्रकाशित तारीख : October 17, 2026
    बोरिवली येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये दिव्यांगांच्या 'मिट्टी कॅफे'चे उदघाटन

    दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पाठबळ आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    बोरिवली येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये दिव्यांगांच्या ‘मिट्टी कॅफे’चे उदघाटन

    मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्तींच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि सन्मान दिल्यास त्या स्वावलंबी होऊन समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यावसायिक उपक्रमांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून दिव्यांगांच्या उपक्रमांना पाठबळ दिल्यास त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येईल असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्यातील कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा ‘मिट्टी कॅफे’ हा सामाजिक समावेशकतेचा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बोरिवली मुंबई येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे शारीरिक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या प्रौढ दिव्यांग व्यक्तींद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    उदघाटन समारोहाला आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक अलिना आलम, स्कायसिटी मॉलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तनू प्रसाद, ‘प्रोजेक्ट मुंबई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी , मिट्टी कॅफेच्या संचालिका लता नायक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक उपस्थित होते.

    मिट्टी कॅफेचे प्रतिष्ठान आज राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांसह मुंबई, बंगळुरू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून महाराष्ट्र लोकभवन येथे देखील अश्या प्रकारचा कॅफे सुरु करण्याबद्दल विचार करण्यात येईल असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांनी बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनी तयार केलेला केक कापला तसेच कॅफेमध्ये पहिली ऑर्डर दिली. व्हीलचेअरवरील कॅशियर आणि दिव्यांग प्रौढ सदस्यांच्या चमूने ही ऑर्डर सर्व्ह केली. दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्याला आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक केले.

    शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होणारा सेवाभाव महत्त्वाचा

    आपल्या भाषणात राज्यपालांनी मिट्टी कॅफेच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, व्यक्तीचे कार्य, तिचे प्रयत्न आणि कामाप्रती असलेले समर्पण यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. अनेकदा व्यक्तीची कृती आणि कामातील प्रामाणिकपणा हेच तिच्या विचारांचे प्रभावी माध्यम ठरतात. मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग व्यक्ती आपल्या कामातून ही बाब सिद्ध करत आहेत.

    समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केवळ एखाद्या गोष्टीबद्दल सहानुभूती व्यक्त करणे पुरेसे नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशीलता दाखविण्यासोबतच त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान दिले पाहिजे, असे राज्यपालांनी नमूद केले.

    व्यावसायिक विकासासोबत सामाजिक बांधिलकी जपावी

    व्यवसाय आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. व्यावसायिक उपक्रम राबविताना केवळ आर्थिक लाभाचा विचार न करता समाजातील विविध घटकांच्या गरजा, त्यांच्या क्षमता आणि त्यांना उपलब्ध करून देता येणाऱ्या संधी यांचाही विचार केला पाहिजे. व्यावसायिक संस्थांनी सामाजिक संवेदनशीलता जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    स्कायसिटी मॉलच्या सौंदर्याचे, तेथील विविध सुविधांचे आणि या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेचे कौतुक करताना राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. दिव्यांग व्यक्तींच्या स्वप्नांना बळ देणारे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देणारे असे उपक्रम समाजात अधिक व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक

    दिव्यांग व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा त्यांच्यातील क्षमता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण यांना महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची कार्यपद्धती वेगळी असू शकते; मात्र योग्य वातावरण आणि संधी मिळाल्यास प्रत्येकजण आपले योगदान देऊ शकतो. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी अधोरेखित केले.

    मिट्टी कॅफेसारखे उपक्रम दिव्यांग व्यक्तींविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करतात. अशा उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेची ओळख निर्माण होते आणि त्यांना केवळ मदतीची गरज असलेला घटक न मानता समाजाच्या प्रगतीतील सक्रिय भागीदार म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.

    छोट्या प्रयत्नांतून मोठ्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात

    मिट्टी कॅफेच्या संस्थापक अलिना आलम यांनी या उपक्रमाच्या प्रवासाची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. एका छोट्या टेबल आणि छत्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आज देशभरातील सुमारे ८० ठिकाणी पोहोचला असून, या कॅफेचे संचालन दिव्यांग व्यक्ती करतात.

    या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटींहून अधिक कॉफीचे कप ग्राहकांना देण्यात आले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ८० लाखांहून अधिक जेवणाची ताटे वितरित करण्यात आली आहेत. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती स्वतः स्वावलंबी होण्यासोबतच समाजातील इतर गरजू घटकांनाही मदत करू शकतात, असे अलिना आलम यांनी सांगितले.

    दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेविषयी जनजागृती करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजात सर्वसमावेशकतेची भावना रुजविणे हे मिट्टी कॅफेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या स्कायसिटी मॉल व्यवस्थापनाचे आणि सीएसआर भागीदार डीबीएस बँकेचे त्यांनी आभार मानले. भविष्यात अधिकाधिक ठिकाणी अशा कॅफे सुरू करून दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

    मिट्टी कॅफे एक सामाजिक उपक्रम

    मिट्टी कॅफे ही भारतातील एक अतिशय खास कॅफे साखळी आहे. हा सामान्य कॅफे नसून २०१७ मध्ये अलिना आलम यांनी सुरू केलेला एक सामाजिक उपक्रम आहे. हा कॅफे पूर्णपणे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अपंगत्व असलेल्या प्रौढ व्यक्तींकडून चालवला जातो, आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन, सन्मान आणि आदरातिथ्य क्षेत्रात रोजगार मिळवून देणे हे त्याचे ध्येय आहे. आज देशभरात याची ८० ठिकाणे आहेत.

    राज्यपालांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर फीत कापून मिट्टी कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. कॅफेमधील दिव्यांग सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी दोन दिव्यांग सदस्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

    कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    *****

    दिव्यांग व्यक्तियों के सशक्तिकरण के लिए व्यावसायिक सहयोग आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    बोरीवली स्थित ओबेरॉय स्काईसिटी मॉल में दिव्यांगों द्वारा संचालित ‘मिट्टी कैफे’ का उद्घाटन

    मुंबई, 17: दिव्यांग व्यक्तियों की क्षमताओं को पहचानकर उन्हें उचित अवसर, प्रोत्साहन और सम्मान दिया जाए तो वे आत्मनिर्भर बनकर समाज के विकास में महत्वपूर्ण योगदान दे सकते हैं। व्यावसायिक संस्थाएं अपने सामाजिक दायित्व (CSR) फंड के माध्यम से दिव्यांगों से जुड़े उपक्रमों को सहयोग दें तो समाज में सकारात्मक बदलाव लाया जा सकता है, यह प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहां किया।

    राज्यपाल ने कहा कि दिव्यांग व्यक्तियों को रोजगार के अवसर उपलब्ध कराने तथा उनके कौशल और आत्मविश्वास को मंच प्रदान करने वाला ‘मिट्टी कैफे’ सामाजिक समावेशन का एक प्रेरणादायी उपक्रम है।

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा के हाथों मुंबई के बोरीवली स्थित ओबेरॉय स्काईसिटी मॉल में शारीरिक, बौद्धिक और मानसिक रूप से दिव्यांग वयस्क व्यक्तियों द्वारा संचालित ‘मिट्टी कैफे’ का उद्घाटन किया गया। इस अवसर पर वे बोल रहे थे।

    उद्घाटन समारोह में विधायक अतुल भातखलकर, उत्तर प्रदेश विधानसभा के पूर्व विधायक सुभाष पासी, वरिष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कैफे की संस्थापक अलिना आलम, स्काईसिटी मॉल की मुख्य कार्यकारी अधिकारी तनु प्रसाद, ‘प्रोजेक्ट मुंबई’ के मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, मिट्टी कैफे की निदेशक लता नायक तथा दिव्यांग व्यक्ति और उनके अभिभावक उपस्थित थे।

    राज्यपाल ने बताया कि मिट्टी कैफे के प्रतिष्ठान राष्ट्रपति भवन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय के साथ-साथ मुंबई, बेंगलुरु और नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डों पर भी संचालित हो रहे हैं। महाराष्ट्र लोकभवन में भी इसी प्रकार का कैफे शुरू करने की संभावनाओं पर विचार किया जाएगा।

    इस अवसर पर राज्यपाल ने बौद्धिक दिव्यांगता वाले व्यक्तियों द्वारा तैयार किया गया केक काटा और कैफे में पहली ऑर्डर भी दी। व्हीलचेयर पर कार्यरत कैशियर और दिव्यांग वयस्क सदस्यों की टीम ने यह ऑर्डर ग्राहकों तक पहुंचाया। दिव्यांग व्यक्तियों के कौशल और कार्यक्षमता को प्रोत्साहित करने वाले इस उपक्रम की राज्यपाल ने सराहना की।

    शब्दों से अधिक महत्वपूर्ण है कर्मों से व्यक्त होने वाली सेवा भावना

    अपने संबोधन में राज्यपाल ने मिट्टी कैफे के उपक्रम की सराहना करते हुए कहा कि व्यक्ति के कार्य, उसके प्रयास और काम के प्रति उसका समर्पण उसके व्यक्तित्व को दर्शाते हैं। हर भावना को व्यक्त करने के लिए शब्दों की आवश्यकता नहीं होती। कई बार व्यक्ति के कार्य और काम में ईमानदारी ही उसके विचारों को प्रभावी ढंग से व्यक्त करती है। मिट्टी कैफे में कार्यरत दिव्यांग व्यक्ति अपने कार्य के माध्यम से इसे सिद्ध कर रहे हैं।

    उन्होंने कहा कि समाज में सकारात्मक बदलाव लाने के लिए केवल किसी विषय के प्रति सहानुभूति व्यक्त करना पर्याप्त नहीं है, बल्कि उसके लिए वास्तविक और ठोस प्रयास करना आवश्यक है। सामाजिक मुद्दों के प्रति संवेदनशीलता दिखाने के साथ-साथ उनके समाधान के लिए प्रत्येक व्यक्ति को अपनी क्षमता के अनुसार योगदान देना चाहिए।

    व्यावसायिक विकास के साथ सामाजिक प्रतिबद्धता भी जरूरी

    राज्यपाल ने कहा कि व्यवसाय और सामाजिक जिम्मेदारी का समन्वय आज समय की आवश्यकता है। व्यावसायिक गतिविधियां चलाते समय केवल आर्थिक लाभ पर ध्यान केंद्रित करने के बजाय समाज के विभिन्न वर्गों की आवश्यकताओं, उनकी क्षमताओं और उन्हें उपलब्ध कराए जा सकने वाले अवसरों पर भी विचार किया जाना चाहिए।

    उन्होंने व्यावसायिक संस्थाओं से सामाजिक संवेदनशीलता के साथ समाज के समग्र विकास के लिए आगे आने का आह्वान किया।

    स्काईसिटी मॉल की सुंदरता, वहां उपलब्ध विभिन्न सुविधाओं और इस सामाजिक उपक्रम के लिए उपलब्ध कराई गई जगह की सराहना करते हुए राज्यपाल ने आयोजकों को बधाई दी। उन्होंने कहा कि दिव्यांग व्यक्तियों के सपनों को मजबूती देने और उन्हें अपने पैरों पर खड़े होने का अवसर प्रदान करने वाले ऐसे उपक्रमों को समाज में व्यापक स्तर पर शुरू करना आवश्यक है।

    दिव्यांग व्यक्तियों की क्षमता पर विश्वास करना जरूरी

    राज्यपाल ने कहा कि दिव्यांग व्यक्तियों के काम करने के तरीके से अधिक महत्वपूर्ण उनकी क्षमता, काम के प्रति निष्ठा और समर्पण है। प्रत्येक व्यक्ति की कार्यशैली अलग हो सकती है, लेकिन उचित वातावरण और अवसर मिलने पर हर व्यक्ति समाज में अपना योगदान दे सकता है।

    दिव्यांग व्यक्तियों को समाज की मुख्यधारा में शामिल करना, उन्हें रोजगार उपलब्ध कराना और उनके कार्य का सम्मान करना आवश्यक है, उन्होंने कहा।

    उन्होंने कहा कि मिट्टी कैफे जैसे उपक्रम समाज के दिव्यांग व्यक्तियों के प्रति दृष्टिकोण को बदलने में मदद करते हैं। ऐसे उपक्रमों के माध्यम से दिव्यांग व्यक्तियों की क्षमताओं को पहचान मिलती है और उन्हें केवल सहायता की आवश्यकता वाले वर्ग के रूप में नहीं, बल्कि समाज की प्रगति में सक्रिय भागीदार के रूप में देखने की दृष्टि विकसित होती है।

    छोटे प्रयासों से बड़े सामाजिक परिवर्तन की शुरुआत

    मिट्टी कैफे की संस्थापक अलिना आलम ने इस उपक्रम की यात्रा के बारे में जानकारी दी। उन्होंने बताया कि दिव्यांग व्यक्तियों को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बनने और सम्मान के साथ जीवन जीने का अवसर प्रदान करने के उद्देश्य से इस उपक्रम की शुरुआत की गई थी।

    एक छोटी मेज और छतरी से शुरू हुआ यह सफर आज देशभर में लगभग 80 स्थानों तक पहुंच चुका है। इन कैफे का संचालन दिव्यांग व्यक्तियों द्वारा किया जाता है।

    इस उपक्रम के माध्यम से अब तक ग्राहकों को दो करोड़ से अधिक कप कॉफी परोसी जा चुकी है। इसके अलावा आर्थिक रूप से कमजोर वर्गों को 80 लाख से अधिक भोजन की थालियां वितरित की गई हैं।

    अलिना आलम ने कहा कि उचित अवसर और सहयोग मिलने पर दिव्यांग व्यक्ति न केवल स्वयं आत्मनिर्भर बन सकते हैं, बल्कि समाज के अन्य जरूरतमंद वर्गों की भी मदद कर सकते हैं।

    उन्होंने स्पष्ट किया कि दिव्यांग व्यक्तियों की क्षमताओं के बारे में जागरूकता पैदा करना, उन्हें रोजगार के अवसर उपलब्ध कराना और समाज में समावेश की भावना को मजबूत करना मिट्टी कैफे के प्रमुख उद्देश्यों में शामिल है।

    उन्होंने इस उपक्रम की स्थापना में सहयोग करने वाले स्काईसिटी मॉल प्रबंधन और CSR साझेदार DBS बैंक का आभार व्यक्त किया। उन्होंने भविष्य में अधिक से अधिक स्थानों पर ऐसे कैफे शुरू करके दिव्यांग व्यक्तियों को आर्थिक रूप से सशक्त बनाने की इच्छा भी व्यक्त की।

    मिट्टी कैफे : एक सामाजिक उपक्रम

    मिट्टी कैफे भारत की एक अनूठी कैफे श्रृंखला है। यह सामान्य कैफे नहीं, बल्कि वर्ष 2017 में अलिना आलम द्वारा शुरू किया गया एक सामाजिक उपक्रम है।

    यह कैफे मुख्य रूप से शारीरिक, बौद्धिक और मानसिक दिव्यांगता वाले वयस्क व्यक्तियों द्वारा संचालित किए जाते हैं। इसका उद्देश्य उन्हें आर्थिक आत्मनिर्भरता, सम्मान और आतिथ्य क्षेत्र में रोजगार के अवसर उपलब्ध कराना है। वर्तमान में देशभर में इसके लगभग 80 केंद्र हैं।

    कार्यक्रम की शुरुआत राज्यपाल द्वारा दीप प्रज्वलित करके की गई। इसके बाद फीता काटकर मिट्टी कैफे का उद्घाटन किया गया। कैफे में कार्यरत दिव्यांग सदस्यों ने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किया। इस अवसर पर दो दिव्यांग सदस्यों ने अपने अनुभव भी उपस्थित लोगों के साथ साझा किए।

    कार्यक्रम के अंत में ‘प्रोजेक्ट मुंबई’ के संस्थापक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी ने उपस्थित सभी लोगों का आभार व्यक्त किया।