18.10.2026: राज्यपालांची जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘नवरात्रोत्सव २०२६’ कार्यक्रमास भेट
राज्यपालांची जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘नवरात्रोत्सव २०२६’ कार्यक्रमास भेट
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील जॅस्मिन हॉलमध्ये आयोजित फाल्गुनी पाठक यांच्या ‘नवरात्रोत्सव २०२६’ कार्यक्रमालाही भेट दिली. या कार्यक्रमात त्यांनी देवीची पूजा-आरती केली.
यावेळी माजी खासदार मनोज कोटक, सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आणि आसिफ भामला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘से नो टू ड्रग्ज’ अर्थात अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.