18.10.2026: राज्यपालांची ‘बंगाल कल्चरल असोसिएशन’च्या वतीने आयोजित दुर्गापूजा उत्सवाला भेट
राज्यपालांची ‘बंगाल कल्चरल असोसिएशन’च्या वतीने आयोजित दुर्गापूजा उत्सवाला भेट
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज जुहू येथील स्पोर्ट्स ग्राउंड येथे ‘बंगाल कल्चरल असोसिएशन’च्या वतीने आयोजित दुर्गापूजा उत्सवाला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी देवीची पूजा आरती केली व उपस्थितांशी बंगाली भाषेतून संवाद साधला.
बंगाल कल्चरल असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णेंदू सेन तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी दुर्गा पूजा मंडळांना ‘से नो टू ड्रग्ज’ व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.