बंद

    20.08.2026: महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : August 21, 2026
    20.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि जर्मनीच्या हॅसेन राज्याचे मुख्यमंत्री बोरिस राईन यांनी महाराष्ट्र तसेच जर्मनीतील आर्थिकदृष्ट्या आघाडीचे राज्य असलेल्या हॅसेन या राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राला संबोधित केले. 
चर्चासत्राचे आयोजन औषध शोध, औषधी निर्माण आणि औषध-संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात डिजिटल फार्मा व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पार्टेक्स एआय या संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पार्टेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंजन भारद्वाज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान, पार्टेक्स एआयचे सहसंस्थापक गौरव त्रिपाठी, पार्टेक्स एआयचे सल्लागार डॉ. संकेत खरपुडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनवरे यांच्यासह भारत व जर्मनीतील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

    महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हॅसेन राज्यांनी आर्थिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २०) केले.
    मुंबई–फ्रँकफर्ट तसेच महाराष्ट्र–हॅसेन यांच्यातील सहकार्यामुळे उद्योग, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
    पारटेक्स एआयच्या वतीने मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) येथे आयोजित ‘महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान संवाद’ कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. हॅसेन राज्याचे मंत्री-अध्यक्ष (मुख्यमंत्री) बोरिस राईन यावेळी उपस्थित होते.
    राज्यपाल म्हणाले, फ्रँकफर्ट हे हॅसेन मधील मोठे शहर जर्मनीचे आर्थिक केंद्र तसेच युरोपमधील प्रमुख वित्तीय केंद्रांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून देशातील प्रमुख बँका, भांडवली बाजार, कॉर्पोरेट मुख्यालये आणि गुंतवणूकदारांचे केंद्र येथे आहे. त्यामुळे फ्रँकफर्टला मुंबईशी आणि हॅसेनला महाराष्ट्राशी जोडणे उभयपक्षी लाभाचे ठरेल.
    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतातील सर्वांत मोठी राज्य अर्थव्यवस्था असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे १३.५ टक्के, औद्योगिक उत्पादनात १५.५ टक्के, तर देशाच्या निर्यातीत सुमारे १५ टक्के वाटा आहे.
    सन २००० ते २०२५ या कालावधीत भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी जर्मन शिष्टमंडळाला सांगितले.
    महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ, विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला औद्योगिक पाया, भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, संशोधन संस्था, पायाभूत सुविधा आणि जागतिक संपर्क व्यवस्था उपलब्ध असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
    महाराष्ट्राची सुमारे १३ कोटी लोकसंख्या ही जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. राज्यात दरवर्षी मोठ्या संख्येने अभियंते, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कुशल व्यावसायिक तयार होतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
    महाराष्ट्र आणि जर्मनीमधील विद्यमान सहकार्याचा संदर्भ देताना राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र आणि बाडेन-वुर्टेमबर्ग यांच्यात २०१५ पासून सहकार्य आहे. मुंबई हे वित्त, फिनटेक, लॉजिस्टिक्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे, तर पुणे हे वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनाचे भारतातील प्रमुख केंद्र आहे.
    महाराष्ट्रात भारतातील सुमारे २३ टक्के मोटार वाहनांचे उत्पादन होते. मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, कॉन्टिनेंटल आणि बॉश यांसारख्या जागतिक कंपन्या महाराष्ट्रात उत्पादन करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
    हॅसेनसोबत घनिष्ट सहकार्य करण्यासाठी ही भक्कम पायाभरणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
    सहकार्याच्या संधी केवळ वाहन उद्योगापुरत्या मर्यादित नसून औषधीनिर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही मोठ्या संधी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख औषधनिर्मिती आणि जीवनविज्ञान केंद्रांपैकी एक असून, औषधनिर्मिती आणि निर्यातीत राज्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्यात अनेक एफडीए -मान्यताप्राप्त उत्पादन प्रकल्प तसेच जागतिक कंपन्या कार्यरत आहेत.
    हॅसेनची औषधनिर्मिती, रसायने, जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता आणि महाराष्ट्राची उत्पादनक्षमता, कुशल मनुष्यबळ व मोठी बाजारपेठ यांच्यात नैसर्गिक पूरकता असल्याचे राज्यपालांनी सांगितले. दोन्ही प्रदेशांनी संयुक्त संशोधन, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आरोग्यसेवा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
    महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला जात असून आंतरराष्ट्रीय सहकार्यही वाढवले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
    उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्यावर भर देताना ते म्हणाले की, हॅसेनमधील एखाद्या औद्योगिक कंपनीने महाराष्ट्रातील एआय कंपनीसोबत काम करून आपल्या कारखान्याची कार्यक्षमता वाढवावी आणि जर्मन अभियांत्रिकी कंपनीने पुण्यात संशोधन व विकास केंद्र स्थापन करून जर्मन क्षेत्रीय कौशल्य आणि भारतीय अभियांत्रिकी प्रतिभेचा संगम घडवावा, अशी भागीदारी निर्माण झाली पाहिजे.
    महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान संवादातून नवोन्मेष, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि सामायिक आर्थिक विकासावर आधारित भागीदारीची नवी पिढी निर्माण होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
    UPI क्रांतीचे हॅसेनच्या मंत्री-अध्यक्षांकडून कौतुक
    हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरिस राईन यांनी भारतातील युपीआय व्यवहारांच्या क्रांतीचे कौतुक केले. हॅसेनमध्ये सुमारे ४० हजार भारतीय नागरिकांचा समुदाय असून, हा समुदाय हॅसेनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
    पारटेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहसंस्थापक गौरव त्रिपाठी यांनी हॅसेनमध्ये काम करण्याच्या आपल्या अनुभवांची माहिती दिली.
    नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरिस राईन यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली.
    **
    महाराष्ट्र–हैसेन के बीच व्यवसाय, प्रौद्योगिकी और नवाचार सहयोग बढ़ाया जाए : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबई, 20 अगस्त : महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने महाराष्ट्र और जर्मनी के हैसेन राज्य के बीच आर्थिक, तकनीकी और नवाचार के क्षेत्र में सहयोग बढ़ाने का आह्वान किया। उन्होंने कहा कि मुंबई–फ्रैंकफर्ट तथा महाराष्ट्र–हैसेन के बीच मजबूत साझेदारी से उद्योग, निवेश, अनुसंधान और वैश्विक व्यापार के क्षेत्र में नए अवसर पैदा होंगे।
    पारटेक्स एआई की ओर से मुंबई स्थित नेशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) में आयोजित ‘महाराष्ट्र–हैसेन आर्थिक एवं प्रौद्योगिकी संवाद’ में राज्यपाल संबोधित कर रहे थे। इस अवसर पर हैसेन राज्य के मंत्री-अध्यक्ष (मुख्यमंत्री) बोरिस राइन उपस्थित थे।
    राज्यपाल ने कहा, “फ्रैंकफर्ट हैसेन का प्रमुख शहर होने के साथ-साथ जर्मनी का आर्थिक केंद्र और यूरोप के प्रमुख वित्तीय केंद्रों में से एक है। इसी प्रकार मुंबई भारत की वित्तीय राजधानी है तथा देश के प्रमुख बैंक, पूंजी बाजार, कॉरपोरेट मुख्यालय और निवेशक समुदाय यहां स्थित हैं। इसलिए फ्रैंकफर्ट को मुंबई और हैसेन को महाराष्ट्र से जोड़ना दोनों पक्षों के लिए लाभकारी सिद्ध होगा।”
    महाराष्ट्र को भारत की सबसे बड़ी राज्य अर्थव्यवस्था बताते हुए राज्यपाल ने कहा कि राज्य का देश की राष्ट्रीय आय में लगभग 13.5 प्रतिशत, औद्योगिक उत्पादन में 15.5 प्रतिशत और देश के निर्यात में लगभग 15 प्रतिशत योगदान है।
    उन्होंने जर्मन प्रतिनिधिमंडल को बताया कि वर्ष 2000 से 2025 के बीच भारत में आने वाले कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश (FDI) का लगभग 31 प्रतिशत महाराष्ट्र में आया।
    राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र में विशाल बाजार, विविधतापूर्ण औद्योगिक आधार, पूंजी, प्रौद्योगिकी, प्रतिभाशाली मानव संसाधन, अनुसंधान संस्थान, बुनियादी ढांचा और वैश्विक संपर्क की सुविधाएं उपलब्ध हैं। महाराष्ट्र की लगभग 13 करोड़ की आबादी विश्व के अनेक देशों की आबादी से अधिक है। राज्य में हर वर्ष बड़ी संख्या में इंजीनियर, डॉक्टर, तकनीकी विशेषज्ञ और कुशल पेशेवर तैयार होते हैं, जो अंतरराष्ट्रीय सहयोग के लिए मजबूत आधार प्रदान करते हैं।
    महाराष्ट्र और जर्मनी के बीच मौजूदा सहयोग का उल्लेख करते हुए राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र और बाडेन-वुर्टेमबर्ग के बीच वर्ष 2015 से सहयोग जारी है। मुंबई वित्त, फिनटेक, लॉजिस्टिक्स और अंतरराष्ट्रीय व्यापार का प्रमुख केंद्र बन चुका है, जबकि पुणे भारत में ऑटोमोबाइल विनिर्माण, इंजीनियरिंग, सूचना प्रौद्योगिकी और अनुसंधान का एक प्रमुख केंद्र है।
    राज्यपाल ने बताया कि महाराष्ट्र में भारत के लगभग 23 प्रतिशत मोटर वाहनों का उत्पादन होता है। मर्सिडीज-बेंज, फॉक्सवैगन, कॉन्टिनेंटल और बॉश जैसी वैश्विक कंपनियां महाराष्ट्र के औद्योगिक पारिस्थितिकी तंत्र का हिस्सा हैं।
    उन्होंने कहा कि यह हैसेन के साथ और अधिक गहरे सहयोग के लिए एक मजबूत आधार प्रदान करता है।
    राज्यपाल ने कहा कि सहयोग की संभावनाएं केवल ऑटोमोबाइल क्षेत्र तक सीमित नहीं हैं, बल्कि फार्मास्युटिकल और जीवन विज्ञान के क्षेत्र में भी व्यापक अवसर मौजूद हैं। महाराष्ट्र भारत के प्रमुख औषधि निर्माण और जीवन विज्ञान केंद्रों में से एक है तथा औषधि उत्पादन और निर्यात में राज्य का महत्वपूर्ण योगदान है। राज्य में अनेक FDA-मान्यता प्राप्त उत्पादन संयंत्र और वैश्विक कंपनियां कार्यरत हैं।
    उन्होंने कहा कि हैसेन की फार्मास्युटिकल्स, रसायन, जैव-प्रौद्योगिकी और चिकित्सा प्रौद्योगिकी के क्षेत्र में विशेषज्ञता तथा महाराष्ट्र की विनिर्माण क्षमता, कुशल मानव संसाधन और विशाल बाजार एक-दूसरे के पूरक हैं। दोनों क्षेत्रों को संयुक्त अनुसंधान, जैव-प्रौद्योगिकी, चिकित्सा उपकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्वास्थ्य सेवाओं और उन्नत विनिर्माण के क्षेत्र में सहयोग करना चाहिए।
    राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र के विश्वविद्यालयों में कृत्रिम बुद्धिमत्ता को शैक्षणिक पाठ्यक्रमों में शामिल किया जा रहा है तथा अंतरराष्ट्रीय सहयोग को भी बढ़ावा दिया जा रहा है।
    उद्योग और शिक्षा जगत के बीच व्यावहारिक सहयोग पर जोर देते हुए उन्होंने कहा कि हैसेन की कोई औद्योगिक कंपनी महाराष्ट्र की किसी एआई कंपनी के साथ मिलकर अपने कारखाने की कार्यक्षमता बढ़ा सके और कोई जर्मन इंजीनियरिंग कंपनी पुणे में अनुसंधान एवं विकास केंद्र स्थापित कर जर्मन क्षेत्रीय विशेषज्ञता और भारतीय इंजीनियरिंग प्रतिभा का संगम कर सके, ऐसी साझेदारियां विकसित की जानी चाहिए।
    “महाराष्ट्र–हैसेन आर्थिक एवं प्रौद्योगिकी संवाद से नवाचार, निवेश, प्रौद्योगिकी और साझा आर्थिक विकास पर आधारित साझेदारी की एक नई पीढ़ी का निर्माण होगा,” ऐसा विश्वास राज्यपाल ने व्यक्त किया।
    हैसेन के मंत्री-अध्यक्ष ने UPI क्रांति की सराहना की
    हैसेन के मंत्री-अध्यक्ष बोरिस राइन ने भारत में UPI लेन-देन के क्षेत्र में हुई क्रांति की सराहना की। उन्होंने कहा कि हैसेन में लगभग 40 हजार भारतीयों का समुदाय रहता है, जो राज्य की अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण योगदान दे रहा है।
    पारटेक्स एआई के संस्थापक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह-संस्थापक गौरव त्रिपाठी ने हैसेन में काम करने के अपने अनुभव साझा किए।
    नेशनल स्टॉक एक्सचेंज के मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान ने भी इस अवसर पर अपने विचार व्यक्त किए।
    कार्यक्रम के बाद राज्यपाल जिष्णु देव वर्मा और हैसेन के मंत्री-अध्यक्ष बोरिस राइन ने नेशनल स्टॉक एक्सचेंज का दौरा किया और वहां की कार्यप्रणाली की जानकारी प्राप्त की।
    **