बंद

    21.09.2026: सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

    प्रकाशित तारीख : September 21, 2026
    21.09.2026:  राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी, मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट दिली तसेच विविध सेवाकार्याची पाहणी केली.  राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसेच बहुविकलांग व बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला.सुरुवातीला राज्यपालांनी ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर' केंद्रांना भेट दिली. या केंद्रांमध्ये कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त अंतिम अवस्थेतील लहान मुले व ज्येष्ठ रुग्णांची काळजी घेतली जाते.त्यानंतर राज्यपालांनी वात्सल्य फाऊंडेशनला भेट दिली. या ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांची काळजी घेतली जाते. राज्यपालांनी त्यानंतर ‘बाल आशा धाम’ या संस्थेला भेट दिली. या संस्थेमार्फत अनाथ व परित्यक्त बालकांसाठी निवासी सुविधा तसेच दत्तक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.राज्यपालांनी ‘ओम क्रिएशन्स’ या अन्य एका संस्थेला दिलेल्या भेटीत बौद्धिक दिव्यांग तसेच बहुविकलांग व्यक्तींशी संवाद साधला.किंग जॉर्ज पंचम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस यांनी राज्यपालांना किंग जॉर्ज ट्रस्टच्या कार्याची तसेच विस्तार योजनेची माहिती दिली.यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्टचे विश्वस्त चेतन रायकर, भावना रॉय आणि अनिल कामत, वात्सल्य फाऊंडेशनच्या विश्वस्त स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’चे कार्यकारी संचालक सुनील अरोरा तसेच ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’च्या संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित होते.

    सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

    राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी, मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट दिली तसेच विविध सेवाकार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसेच बहुविकलांग व बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला.
    सुरुवातीला राज्यपालांनी ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर’ केंद्रांना भेट दिली. या केंद्रांमध्ये कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त अंतिम अवस्थेतील लहान मुले व ज्येष्ठ रुग्णांची काळजी घेतली जाते.
    त्यानंतर राज्यपालांनी वात्सल्य फाऊंडेशनला भेट दिली. या ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांची काळजी घेतली जाते. राज्यपालांनी त्यानंतर ‘बाल आशा धाम’ या संस्थेला भेट दिली. या संस्थेमार्फत अनाथ व परित्यक्त बालकांसाठी निवासी सुविधा तसेच दत्तक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
    राज्यपालांनी ‘ओम क्रिएशन्स’ या अन्य एका संस्थेला दिलेल्या भेटीत बौद्धिक दिव्यांग तसेच बहुविकलांग व्यक्तींशी संवाद साधला.
    किंग जॉर्ज पंचम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस यांनी राज्यपालांना किंग जॉर्ज ट्रस्टच्या कार्याची तसेच विस्तार योजनेची माहिती दिली.
    यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्टचे विश्वस्त चेतन रायकर, भावना रॉय आणि अनिल कामत, वात्सल्य फाऊंडेशनच्या विश्वस्त स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’चे कार्यकारी संचालक सुनील अरोरा तसेच ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’च्या संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित होते.
    **
    सेवा संकल्प अभियान : राज्यपालों का वरिष्ठ नागरिकों, बहुविकलांग एवं अनाथ बच्चों से संवाद

    राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान के अंतर्गत महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज मुंबई के महालक्ष्मी स्थित किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्ट का दौरा किया तथा ट्रस्ट द्वारा संचालित विभिन्न सेवाकार्यों का अवलोकन किया। इस अवसर पर राज्यपाल ने ट्रस्ट परिसर में कार्यरत विभिन्न सेवाभावी संस्थाओं में उपचार, प्रशिक्षण एवं पुनर्वास प्राप्त कर रहे बच्चों, वरिष्ठ नागरिकों तथा बहुविकलांग एवं बौद्धिक दिव्यांग व्यक्तियों से संवाद किया।
    सबसे पहले राज्यपाल ने ‘सुकून निलाय पैलिएटिव केयर’ केंद्रों का दौरा किया। इन केंद्रों में कैंसर के अलावा अन्य गंभीर बीमारियों से पीड़ित अंतिम अवस्था के बच्चों एवं वरिष्ठ मरीजों की देखभाल की जाती है।
    इसके बाद राज्यपाल ने वात्सल्य फाउंडेशन का दौरा किया। यह संस्था सड़क पर रहने वाले अनाथ एवं असुरक्षित बच्चों की देखभाल तथा उनके समग्र विकास के लिए कार्य करती है। इसके बाद राज्यपाल ने ‘बाल आशा धाम’ का दौरा किया। संस्था द्वारा अनाथ एवं परित्यक्त बच्चों के लिए आवासीय सुविधा तथा दत्तक सेवा उपलब्ध कराई जाती है।
    राज्यपाल ने ‘ओम क्रिएशन्स’ नामक एक अन्य संस्था का भी दौरा किया तथा वहां बौद्धिक दिव्यांग एवं बहुविकलांग व्यक्तियों से संवाद किया।
    किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्ट के अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस ने राज्यपाल को ट्रस्ट द्वारा किए जा रहे कार्यों तथा उसकी विस्तार योजनाओं की जानकारी दी।
    इस अवसर पर मुंबई महानगरपालिका की अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्ट के न्यासी चेतन रायकर, भावना रॉय एवं अनिल कामत, वात्सल्य फाउंडेशन की न्यासी स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’ के कार्यकारी निदेशक सुनील अरोरा तथा ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’ की संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित थीं।