बंद

    23.10.2026 : राज्यपालांनी घेतला ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाचा प्रिव्ह्यू

    प्रकाशित तारीख : October 27, 2026
    23.10.2026 :  महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या ७५ वर्षात झालेल्या विविध राष्ट्रप्रमुखांच्या ऐतिहासिक भेटींच्या छायाचित्रांचे संकलन करण्यात आले असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अलीकडेच लोकभवन येथे या प्रदर्शनाचा  प्रिव्ह्यू  पाहिला. राज्यपालांनी छायाचित्रांची माहिती जाणून घेतली व प्रदर्शनाच्या मांडणीसंदर्भात सूचना केल्या. लोकभवन येथील जुन्या पेंटिंग्सचे रिस्टोरेशन करून घेण्याची देखील त्यांनी महत्वपूर्ण सूचना केली. छायाचित्रांचे संकलन लोकभवन येथील जनसंपर्क शाखेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना छायाचित्रांची माहिती दिली.  राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.  संकलित छायाचित्रांमध्ये सन १९५४ साली युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांची राजभवन भेट, इथिओपियाचे राजे हॅले सिलासी यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे झालेले शाही भोज (१९५४),  चीनचे पंतप्रधान चाऊ एन्लाय यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन (१९५६),  अफगाणिस्तानचे राजे मोहम्मद झहीर शाह - मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची राजभवन येथे झालेली भेट (१९५८),   घानाचे अध्यक्ष डॉ क्वामे निकृमा - राज्यपाल श्रीप्रकाश भेट (१९५९),   प्रिन्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे झालेले चहापान (१९८०),    व्लादिमिर पुतीन - राज्यपाल पी सी अलेक्झांडर भेट (२०००),  अलिकडल्या काळातील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ - पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट (२०२६), ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर - नरेंद्र मोदी भेट (ऑक्टोबर २०२५), सोव्हियत गुडविल मिशन - पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भेट, इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल सलाम आरिफ यांच्या सन्मानार्थ राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांचे स्नेहभोजन, जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल - राज्यपाल एस एम कृष्णा भेट (२००७), पूर्व जर्मनीचे अध्यक्ष एरिक होनेकर यांचे राज्यपाल सादिक अली व मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेलं स्वागत (१९७९) यांसह ३२ विविध छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. लवकरच  लोकभवन येथे  छायाचित्रांची मांडणी करण्यात येऊन अभ्यागतांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

    राज्यपालांनी घेतला ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाचा प्रिव्ह्यू

    महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या ७५ वर्षात झालेल्या विविध राष्ट्रप्रमुखांच्या ऐतिहासिक भेटींच्या छायाचित्रांचे संकलन करण्यात आले असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अलीकडेच लोकभवन येथे या प्रदर्शनाचा प्रिव्ह्यू पाहिला.

    राज्यपालांनी छायाचित्रांची माहिती जाणून घेतली व प्रदर्शनाच्या मांडणीसंदर्भात सूचना केल्या. लोकभवन येथील जुन्या पेंटिंग्सचे रिस्टोरेशन करून घेण्याची देखील त्यांनी महत्वपूर्ण सूचना केली.

    छायाचित्रांचे संकलन लोकभवन येथील जनसंपर्क शाखेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना छायाचित्रांची माहिती दिली. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव एस रामामुर्ती तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    संकलित छायाचित्रांमध्ये सन १९५४ साली युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांची राजभवन भेट, इथिओपियाचे राजे हॅले सिलासी यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे झालेले शाही भोज (१९५४), चीनचे पंतप्रधान चाऊ एन्लाय यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन (१९५६), अफगाणिस्तानचे राजे मोहम्मद झहीर शाह – मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची राजभवन येथे झालेली भेट (१९५८), घानाचे अध्यक्ष डॉ क्वामे निकृमा – राज्यपाल श्रीप्रकाश भेट (१९५९), प्रिन्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे झालेले चहापान (१९८०), व्लादिमिर पुतीन – राज्यपाल पी सी अलेक्झांडर भेट (२०००), अलिकडल्या काळातील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट (२०२६), ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर – नरेंद्र मोदी भेट (ऑक्टोबर २०२५), सोव्हियत गुडविल मिशन – पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भेट, इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल सलाम आरिफ यांच्या सन्मानार्थ राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांचे स्नेहभोजन, जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल – राज्यपाल एस एम कृष्णा भेट (२००७), पूर्व जर्मनीचे अध्यक्ष एरिक होनेकर यांचे राज्यपाल सादिक अली व मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेलं स्वागत (१९७९) यांसह ३२ विविध छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. लवकरच लोकभवन येथे छायाचित्रांची मांडणी करण्यात येऊन अभ्यागतांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

    Panels-historic exhibition–various visits of foreign VVIPs