24.08.2026: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API) च्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली.
यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. प्रौढांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारसी या प्रकाशनात देण्यात आल्या आहेत असे डॉ वोरा यांनी सांगितले.दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशातील पाच लाख लोक मृत्युमुखी पडतात. लसीकरणामुळे हे मृत्यू टाळता येतील असे डॉ वोरा यांनी यावेळी सांगितले.
दुसरे प्रकाशन ‘COPD Compass 2026’ या शीर्षकाचे असून, हे भारतातील COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease – दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार) व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. भारतातील COPD व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञांच्या पॅनेलने केलेल्या शिफारसींचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकारांचे निदान कसे करायचे व उपचार कसा करायचा या संदर्भात दुसऱ्या पुस्स्तकात मार्गदर्शन असल्याचे वोरा यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या एम.डी. स्वाती दलाल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Delegation of Maharashtra State Chapter of the Association of Physicians of India Meets Governor
Members of the Maharashtra State Chapter of the Association of Physicians of India led by Dr Agam Vora, Honorary Secretary today met the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma and presented to him two Medical Publications of National Relevance at Lok Bhavan, Mumbai.
The first publication presented to the Governor titled ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ has been brought out by the Indian Medical Association with 23 different medical societies.
The second book presented to the Governor is titled ‘COPD Compass 2026’ which is a Comprehensive Guide to COPD Management in India. It contains recommendations from a Panel of Experts on the Management of Chronic Obstructive Pulmonary Disease in India.
Dr Rakesh Badade, Dr Milind Nadkar, Dr Amit Saraf, Dr Jaysh Lele, Ashutosh Pande and Swati Dalal, MD, Zydus Healthcare were among those present.