बंद

    24.10.2026: तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे; जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा – राज्यपाल

    प्रकाशित तारीख : October 24, 2026
    24.10.2026: दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेड मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या पोलीस दलांच्या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीला आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुंबईहून ही मोटारसायकल रॅली स्टॅचू ऑफ युनिटी गुजरात येथे जाणार असून या रॅलीमध्ये महाराष्ट्रासह १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस पथकांचा समावेश आहे.  या मोटारसायकल यात्रेतून राष्ट्रीय एकात्मता आणि ‘नशामुक्त भारत’ हे संदेश दिले जाणार आहेत. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल राजकुमार व्हटकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस तसेच १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस पथके आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीसाठी ‘नशामुक्त भारत’ ही संकल्पना निवडल्याबद्दल तसेच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन केल्याबद्दल राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन केले.  मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रॅलीमध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुद्दुचेरी, अंदमान व निकोबार बेटे, गोवा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप यांसह महाराष्ट्र पोलीस दलाचे पथक सहभागी झाले आहेत.

    तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे; जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलांच्या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे स्वागत; राज्यपालांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली गुजरातकडे रवाना

    मुंबई, दि. २४ : अमली पदार्थांचे व्यसन ही समाजापुढील, विशेषतः तरुण पिढीसमोरील गंभीर समस्या आहे. अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्याबरोबरच त्यांची मागणी कमी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे. तरुण पिढीने अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘नशामुक्त भारत – फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल बोलत होते. मुंबईतील नरीमन पॉईंट येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती,राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्यासह विविध राज्यांतील पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला गुजरातकडे प्रस्थान देण्यात आले. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस दलांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे.

    राष्ट्रीय एकात्मतेच्या रक्षणासाठी सदैव सतर्क राहणे आवश्यक

    राज्यपाल म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात ऐतिहासिक आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सशक्त आणि एकसंध भारताचा पाया घातला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे.

    महाराष्ट्र पोलीस दल आपल्या व्यावसायिक कौशल्यासाठी, समर्पणासाठी आणि उत्कृष्ट सेवेसाठी देशभरात ओळखले जाते. राज्यात शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षित व उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात पोलिसांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोलीतील नक्षलवादी कारवायांचा मुकाबला करण्यातही महाराष्ट्र पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गडचिरोली जिल्हा आता महत्त्वाचे पोलाद केंद्र म्हणून उदयास येत असून, तेथे विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

    अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासोबत मागणी कमी करण्यावरही भर द्यावा

    अमली पदार्थांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी त्यांचा पुरवठा रोखण्याबरोबरच मागणी कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखणे तसेच तस्कर आणि विक्रेत्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करणे ही जबाबदारी पोलीस आणि अमली पदार्थविरोधी यंत्रणांची आहे. मात्र, अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्रात अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी तसेच तस्कर आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी अमली पदार्थविरोधी कृती दल स्थापन करण्यात आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

    महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’

    विद्यापीठांचे कुलपती या नात्याने महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ हाती घेण्यात आले आहे. शैक्षणिक परिसर अमली पदार्थ आणि इतर व्यसनकारक पदार्थांपासून मुक्त ठेवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. यासाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून, त्याद्वारे हजारो विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, कुटुंबे, नागरी समाज आणि पोलीस यांनी एकत्रितपणे या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविल्यास अमली पदार्थमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल. मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती आनंददायी असून, तरुणांनी या अभियानात सहभागी होऊन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    राष्ट्रीय एकता आणि अमली पदार्थमुक्त भारताचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अभिनंदन केले. रॅलीतील सर्व सहभागींचा प्रवास सुरक्षित आणि यशस्वी होवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

    नक्षलमुक्त भारताप्रमाणे नशामुक्त भारतासाठीही सामूहिक प्रयत्न आवश्यक

    राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी प्रास्ताविकात रॅलीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकतानगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर राष्ट्रीय एकता परेड आयोजित केली जाते. यंदा ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी विविध राज्यांतील मोटारसायकलस्वार आपापल्या राजधानीतून या उपक्रमात सहभागी झाले आहेत. विविध शहरे आणि गावांमध्ये जनजागृती करत ही रॅली गुजरातकडे रवाना झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

    नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पोलीस दलांनी दिलेल्या योगदानाप्रमाणेच अमली पदार्थांविरोधातील लढ्यातही सर्व पोलीस दलांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि इतर राज्यांतील पोलीस पथके नशामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

    या कार्यक्रमात के.सी. महाविद्यालय, एच आर महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, HSNC विद्यापीठ, विल्सन महाविद्यालय आणि पुरुषोत्तम हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. रोशन शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक संजय जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.

    **
    युवाओं को नशामुक्त भारत के दूत बनना चाहिए; जनजागरूकता, रोकथाम और पुनर्वास पर जोर दें — राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    राष्ट्रीय एकता दिवस के अवसर पर पुलिस बलों की राष्ट्रीय मोटरसाइकिल रैली का स्वागत; राज्यपाल ने हरी झंडी दिखाकर रैली को गुजरात के लिए रवाना किया

    मुंबई, 24 अक्टूबर: नशीली दवाओं की लत समाज के सामने, विशेष रूप से युवा पीढ़ी के सामने एक गंभीर समस्या है। नशीली दवाओं की आपूर्ति रोकने के साथ-साथ उनकी मांग कम करने के लिए जनजागरूकता, रोकथाम, पुनर्वास और नशे की लत से प्रभावित लोगों को सहयोग देना आवश्यक है। युवाओं को *नशामुक्त भारत के दूत* बनना चाहिए, यह आह्वान राज्यपाल *जिष्णु देव वर्मा* ने किया।

    सरदार वल्लभभाई पटेल की 151वीं जयंती* के अवसर पर राष्ट्रीय एकता दिवस की पृष्ठभूमि में आयोजित *‘नशामुक्त भारत – फाइट अगेंस्ट ड्रग्स’ राष्ट्रीय मोटरसाइकिल रैली के शुभारंभ अवसर पर राज्यपाल बोल रहे थे।

    मुंबई के नरीमन पॉइंट पर आयोजित इस कार्यक्रम में महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष *राहुल नार्वेकर, मुंबई शहर के पालकमंत्री **मंगल प्रभात लोढ़ा, मुंबई की महापौर **ऋतु तावड़े, महाराष्ट्र के पुलिस महानिदेशक **सदानंद दाते, मुंबई के पुलिस आयुक्त **देवेन भारती, राज्यपाल के सचिव **डॉ. प्रशांत नारनवरे* तथा राज्य रिजर्व पुलिस बल के अपर पुलिस महानिदेशक *राजकुमार व्हटकर* सहित विभिन्न राज्यों के पुलिस अधिकारी, कर्मचारी और विद्यार्थी उपस्थित थे।

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने हरी झंडी दिखाकर मोटरसाइकिल रैली को गुजरात के लिए रवाना किया। विभिन्न राज्यों और केंद्रशासित प्रदेशों के पुलिस बलों के प्रतिनिधियों के साथ-साथ केंद्रीय रिजर्व पुलिस बल के अधिकारी और जवान भी इस रैली में शामिल हुए हैं।

    राष्ट्रीय एकता का संदेश देने के साथ-साथ युवाओं में नशीली दवाओं के दुष्परिणामों के प्रति जनजागरूकता पैदा करना इस रैली का उद्देश्य है। यह रैली गुजरात स्थित *स्टैच्यू ऑफ यूनिटी* तक पहुंचेगी।

    राष्ट्रीय एकता की रक्षा के लिए सदैव सतर्क रहना आवश्यक

    राज्यपाल ने कहा कि *सरदार वल्लभभाई पटेल* ने विभिन्न रियासतों का भारतीय संघ में विलय कराने में ऐतिहासिक और निर्णायक भूमिका निभाई। उनके दूरदर्शी नेतृत्व के कारण मजबूत और एकजुट भारत की नींव रखी गई। राष्ट्रीय एकता की रक्षा के लिए हमें सदैव सतर्क रहना चाहिए।

    महाराष्ट्र पुलिस बल अपनी पेशेवर दक्षता, समर्पण और उत्कृष्ट सेवा के लिए पूरे देश में जाना जाता है। राज्य में शांति, सुरक्षा और कानून-व्यवस्था बनाए रखने के साथ-साथ सुरक्षित एवं उद्योग-अनुकूल वातावरण तैयार करने में पुलिस का महत्वपूर्ण योगदान है।

    गड़चिरोली में नक्सली गतिविधियों का मुकाबला करने में भी महाराष्ट्र पुलिस ने महत्वपूर्ण भूमिका निभाई है। गड़चिरोली जिला अब एक महत्वपूर्ण *इस्पात केंद्र* के रूप में उभर रहा है और वहां विकास के नए अवसर पैदा हो रहे हैं, ऐसा उन्होंने कहा।

    नशीली दवाओं की आपूर्ति रोकने के साथ मांग कम करने पर भी जोर जरूरी

    नशीली दवाओं की समस्या से प्रभावी ढंग से निपटने के लिए उनकी आपूर्ति रोकने के साथ-साथ उनकी मांग कम करने पर भी ध्यान केंद्रित करना आवश्यक है।

    नशीली दवाओं की तस्करी रोकना तथा तस्करों और विक्रेताओं की पहचान कर उनके खिलाफ कार्रवाई करना पुलिस और नशीली दवाओं के खिलाफ काम करने वाली एजेंसियों की जिम्मेदारी है। हालांकि, नशीली दवाओं की मांग कम करने के लिए पूरे समाज को आगे आना आवश्यक है।

    इसके लिए *जनजागरूकता, रोकथाम के उपाय, पुनर्वास और नशे की लत से प्रभावित लोगों को सहयोग* देना जरूरी है, राज्यपाल ने कहा।

    महाराष्ट्र में नशीली दवाओं की तस्करी रोकने तथा तस्करों और विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई करने के लिए एंटी-नारकोटिक्स टास्क फोर्स का गठन किया गया है, इस पर उन्होंने संतोष व्यक्त किया।

    कॉलेजों और विश्वविद्यालयों में ‘नशामुक्त भारत अभियान’

    विश्वविद्यालयों के कुलाधिपति के रूप में कॉलेजों और विश्वविद्यालयों में *‘नशामुक्त भारत अभियान’* शुरू किया गया है। शैक्षणिक परिसरों को नशीली दवाओं और अन्य नशीले पदार्थों से मुक्त रखना इस अभियान का उद्देश्य है।

    इसके लिए एक विशेष पोर्टल तैयार किया गया है, जिसके माध्यम से हजारों विद्यार्थियों ने नशीली दवाओं का सेवन नहीं करने की शपथ ली है, राज्यपाल ने बताया।

    विद्यार्थी, शैक्षणिक संस्थान, परिवार, नागरिक समाज और पुलिस यदि मिलकर इस अभियान में सक्रिय भागीदारी करें, तो नशामुक्त भारत का लक्ष्य हासिल किया जा सकता है।

    मुंबई के कॉलेज विद्यार्थियों की इस कार्यक्रम में उपस्थिति उत्साहजनक है। युवाओं को इस अभियान में शामिल होकर समाज में जनजागरूकता फैलानी चाहिए, ऐसा आह्वान राज्यपाल ने किया।

    राष्ट्रीय एकता और नशामुक्त भारत का संदेश पूरे देश में पहुंचाने के लिए इस रैली के आयोजन पर राज्यपाल ने महाराष्ट्र पुलिस और राज्य रिजर्व पुलिस बल की सराहना की। उन्होंने रैली में शामिल सभी प्रतिभागियों को सुरक्षित और सफल यात्रा के लिए शुभकामनाएं भी दीं।

    नक्सलमुक्त भारत की तरह नशामुक्त भारत के लिए भी सामूहिक प्रयास आवश्यक

    राज्य रिजर्व पुलिस बल के अपर पुलिस महानिदेशक *राजकुमार व्हटकर* ने अपने प्रारंभिक संबोधन में रैली के आयोजन के उद्देश्य की जानकारी दी।
    उन्होंने बताया कि सरदार वल्लभभाई पटेल की जयंती के अवसर पर *31 अक्टूबर* को गुजरात के एकतानगर में स्टैच्यू ऑफ यूनिटी के सामने राष्ट्रीय एकता परेड आयोजित की जाती है। इस वर्ष *‘नशामुक्त भारत’* की अवधारणा को बढ़ावा देने के लिए विभिन्न राज्यों के मोटरसाइकिल सवार अपनी-अपनी राजधानियों से इस पहल में शामिल हुए हैं।

    विभिन्न शहरों और गांवों में जनजागरूकता फैलाते हुए यह रैली गुजरात के लिए रवाना हुई है।

    जिस प्रकार नक्सलमुक्त भारत के निर्माण में पुलिस बलों ने महत्वपूर्ण योगदान दिया है, उसी प्रकार नशीली दवाओं के खिलाफ लड़ाई में भी सभी पुलिस बलों की सक्रिय भागीदारी आवश्यक है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि महाराष्ट्र पुलिस, मुंबई पुलिस और अन्य राज्यों की पुलिस टीमें नशामुक्त भारत के लक्ष्य को हासिल करने के लिए प्रतिबद्ध हैं।

    विभिन्न कॉलेजों के विद्यार्थियों की भागीदारी

    इस कार्यक्रम में के.सी. कॉलेज, एच.आर. कॉलेज, सिडेनहैम कॉलेज, गवर्नमेंट लॉ कॉलेज, HSNC विश्वविद्यालय, विल्सन कॉलेज और पुरुषोत्तम हाई स्कूल के विद्यार्थियों ने भाग लिया।

    कार्यक्रम का संचालन रोशन शेट्टी ने किया।

    राज्य रिजर्व पुलिस बल के कमांडेंट संजय जाधव ने धन्यवाद ज्ञापित किया।

    Governor Jishnu Dev Varma flags off Police Motorcycle Rally