बंद

    26.08.2026: अनाथ, दिव्यांग मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

    प्रकाशित तारीख : August 27, 2026
    26.08.2026 : अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू दिल्या. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला व मुलींसह यंदाचे रक्षाबंधन केल्याचा अतिशय आनंद झाला आहे, अशी भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ व गोरगरीब मुलींसाठी पुरंदर जिल्हा पुणे येथे सुरु केलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या वतीने अनाथ मुलींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड व संपर्क अधिकारी मुकेश चौधरी देखील उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी तसेच आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविकांनी देखील राज्यपालांना राखी बांधली. पालघर जिल्ह्यातील 'सेवा विवेक' ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करीत असलेल्या आदिवासी महिलांनी यावेळी राज्यपालांना पर्यावरण पूरक राखी बांधली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड यावेळी उपस्थित होते. ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली तसेच दिव्य संदेश दिला. आर्य समाज माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनींनी देखील रक्षाबंधनानिमित्त राज्यपालांना राखी बांधली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या दृष्टिहीन व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार व पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या करणाऱ्या 'नॅब' संस्थेतर्फे दृष्टिहीन मुलींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम या देखील उपस्थित होत्या.

    अनाथ, दिव्यांग मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

    आशा सेविका, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन महिला कर्मचारी यांनी देखील राज्यपालांना राखी बांधली

    अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू दिल्या.

    रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला व मुलींसह यंदाचे रक्षाबंधन केल्याचा अतिशय आनंद झाला आहे, अशी भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ व गोरगरीब मुलींसाठी पुरंदर जिल्हा पुणे येथे सुरु केलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या वतीने अनाथ मुलींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड व संपर्क अधिकारी मुकेश चौधरी देखील उपस्थित होते.

    बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी तसेच आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविकांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.

    पालघर जिल्ह्यातील ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करीत असलेल्या आदिवासी महिलांनी यावेळी राज्यपालांना पर्यावरण पूरक राखी बांधली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड यावेळी उपस्थित होते.

    ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली तसेच दिव्य संदेश दिला.

    आर्य समाज माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनींनी देखील रक्षाबंधनानिमित्त राज्यपालांना राखी बांधली.

    नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या दृष्टिहीन व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार व पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या करणाऱ्या ‘नॅब’ संस्थेतर्फे दृष्टिहीन मुलींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम या देखील उपस्थित होत्या.

    *****
    अनाथ एवं दिव्यांग बालिकाओं ने राज्यपाल को बांधी राखी

    आशा कार्यकर्ताओं तथा महानगरपालिका की ठोस अपशिष्ट प्रबंधन महिला कर्मचारियों ने भी राज्यपाल को बांधी राखी

    अनाथ एवं दिव्यांग बालिकाओं तथा महिला सफाई कर्मचारियों सहित विभिन्न क्षेत्रों में कार्यरत महिलाओं ने आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा से लोकभवन, मुंबई में भेंट कर उन्हें रक्षाबंधन के अवसर पर राखी बांधी। इस अवसर पर राज्यपाल ने सभी को रक्षाबंधन की शुभकामनाएं दीं और उपहार भेंट किए।

    राज्यपाल ने कहा कि रक्षाबंधन समाज के सभी वर्गों को एक सूत्र में बांधने वाला पवित्र पर्व है। समाज के विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान दे रही महिलाओं और बालिकाओं के साथ इस वर्ष रक्षाबंधन मनाकर मुझे अत्यंत प्रसन्नता हुई है।

    दिवंगत सिंधुताई सपकाल द्वारा अनाथ एवं गरीब बालिकाओं के लिए पुणे जिले के पुरंदर में शुरू किए गए ममता बाल सदन की ओर से अनाथ बालिकाओं ने राज्यपाल को राखी बांधी। इस अवसर पर संस्था के अध्यक्ष दीपक गायकवाड़ तथा संपर्क अधिकारी मुकेश चौधरी भी उपस्थित थे।

    बृहन्मुंबई महानगरपालिका के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग में कार्यरत महिला कर्मचारियों के साथ-साथ आशा कार्यकर्ताओं एवं स्वास्थ्य स्वयंसेविकाओं ने भी राज्यपाल को राखी बांधी।

    पालघर जिले के ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्र के माध्यम से बांस उत्पादों के जरिए स्वरोजगार कर रही आदिवासी महिलाओं ने राज्यपाल को पर्यावरण-अनुकूल राखी बांधी। इस अवसर पर संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड उपस्थित थे।

    ब्रह्माकुमारी संस्था के नेपियन सी रोड केंद्र की प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी सहित ब्रह्माकुमारी भाई-बहनों ने भी राज्यपाल को राखी बांधी और उन्हें आध्यात्मिक संदेश दिया।

    आर्य समाज, माटुंगा की छात्राओं ने भी रक्षाबंधन के अवसर पर राज्यपाल को राखी बांधी।

    दृष्टिबाधित व्यक्तियों के शिक्षा, रोजगार एवं पुनर्वास के क्षेत्र में कार्यरत नेशनल एसोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) की ओर से दृष्टिबाधित बालिकाओं ने राज्यपाल को राखी बांधी। इस अवसर पर संस्था की कार्यकारी निदेशक पल्लवी कदम भी उपस्थित थीं।

    *****