बंद

    28.09.2026: आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल

    प्रकाशित तारीख : September 29, 2026
    28.09.2026:  आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल चाचण्या आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून द्यावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त एकदिवसीय परिसंवादाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते दादर मुंबई येथील सूर्यवंशी सभागृहात पार पडले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. मधुभाई कोठारी यांना जीवन गौरव पुरस्काराने, डॉ. स्वप्नील पदते यांना युवा धन्वन्तरी पुरस्काराने आणि  मूलराज वडोर यांना  आयुर्वेद उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्व आयुर्वेद परिषदेच्या स्मरणिकेचे तसेच डॉ विनायक तायडे यांच्या नाडी परीक्षण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आयुष विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उद्योजक रणजित पुराणिक, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, विश्व आयुर्वेद परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेंकट गीते तसेच आयुर्वेद क्षेत्रातील वैद्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन जागतिक स्तरावर नेण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
    मुंबई, दि. २८ : आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.
    राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन सूर्यवंशी सभागृह, दादर मुंबई येथे करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
    कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आयुर्वेद उद्योजक रणजित पुराणिक, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वेंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे तसेच वैद्य, संशोधक व आयुर्वेद क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते
    आयुर्वेद ही केवळ रोगोपचाराची पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेदाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक दृष्टिकोनातून कार्य करावे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन व नवोन्मेषासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
    आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणाऱ्या ‘एम्स’ संस्थेप्रमाणे आयुर्वेद विज्ञान व संशोधनासाठी जागतिक दर्जाची संस्था निर्माण करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    विश्व आयुर्वेद परिषदेने आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत काम करावे तसेच आयुर्वेद शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी व अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.
    निरोगी व समृद्ध भारताच्या भविष्यासाठी आयुर्वेदाची महत्त्वपूर्ण भूमिका
    – केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव

    आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार-विहार आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाशी जोडून देशातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
    देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ५० बेड असलेले आयुर्वेदिक रुग्णालय निर्माण केले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
    आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संवर्धनातून आरोग्यासोबतच पर्यावरण, शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
    आयुर्वेदाला आधुनिक वैज्ञानिक संशोधनाची जोड आवश्यक
    -केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक

    आयुर्वेद ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून, पारंपरिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, प्रामाणिक पुरावे आणि क्लिनिकल डेटाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे आयुर्वेदाला देशाच्या तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी स्थान मिळेल, असे ऊर्जा मंत्रालय व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
    आयुर्वेद शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत सक्षम शिक्षण व संशोधन संस्था उभाराव्यात. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाने परस्परपूरक पद्धतीने कार्य करून रुग्णांच्या सुरक्षिततेला आणि वैज्ञानिक पुराव्यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
    आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक – डॉ. विनायक तायडे
    आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आयुर्वेदिक उपचार पद्धतीला राष्ट्रीय उपचार पद्धतीचा दर्जा मिळावा, अशी मागणी विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे यांनी केली. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी वैद्य, संशोधक, विद्यार्थी आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
    यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. मधुभाई कोठारी यांना आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार, . स्वप्नील पदते यांना युवा धन्वंतरी पुरस्कार तर मूलराज वडोर यांना आयुर्वेद उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    आयुर्वेद को आधुनिक विज्ञान से जोड़कर वैश्विक स्तर पर प्रतिष्ठित करने की आवश्यकता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबई, 28 सितंबर: राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज कहा कि आयुर्वेद भारत की प्राचीन और अमूल्य ज्ञान परंपरा है। इस ज्ञान को आधुनिक वैज्ञानिक अनुसंधान, क्लिनिकल परीक्षणों और नवाचार से जोड़कर आयुर्वेद को वैश्विक स्तर पर प्रभावी स्थान दिलाना आवश्यक है।
    राष्ट्रीय आयुर्वेद दिवस के अवसर पर विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र की ओर से दादर, मुंबई स्थित सूर्यवंशी सभागृह में आयोजित एक दिवसीय संगोष्ठी को संबोधित करते हुए राज्यपाल बोल रहे थे।
    इस अवसर पर केंद्रीय आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक, आयुर्वेद उद्यमी रणजीत पुराणिक, मुंबई की पूर्व महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलगुरु डॉ. वेंकट गीते, विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र के अध्यक्ष डॉ. विनायक तायडे तथा आयुर्वेद क्षेत्र के वैद्य, शोधकर्ता और विद्यार्थी उपस्थित थे।
    राज्यपाल ने कहा कि आयुर्वेद केवल रोगों के उपचार की पद्धति नहीं है, बल्कि स्वस्थ जीवनशैली का एक व्यापक ज्ञान-स्रोत है। मधुमेह, मोटापा, उच्च रक्तचाप और हृदय रोग जैसी जीवनशैली से जुड़ी बीमारियों के संदर्भ में आयुर्वेद की महत्वपूर्ण भूमिका हो सकती है। आयुर्वेद और आधुनिक चिकित्सा को एक-दूसरे का पूरक बनकर कार्य करना चाहिए। आयुर्वेद शिक्षा, अनुसंधान और नवाचार को बढ़ावा देने के लिए विश्वस्तरीय संस्थानों, अत्याधुनिक प्रयोगशालाओं और अनुसंधान सुविधाओं की स्थापना आवश्यक है।
    राज्यपाल ने आधुनिक चिकित्सा पद्धति के क्षेत्र में कार्यरत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) की तर्ज पर आयुर्वेद विज्ञान एवं अनुसंधान के लिए एक विश्वस्तरीय संस्थान स्थापित करने का सुझाव दिया।
    उन्होंने विश्व आयुर्वेद परिषद से महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय के साथ मिलकर कार्य करने तथा आयुर्वेद शिक्षा को सुदृढ़ बनाने और पाठ्यक्रमों को अद्यतन करने में सहयोग देने का आह्वान किया।
    निरोगी और समृद्ध भारत के निर्माण में आयुर्वेद की महत्वपूर्ण भूमिका – केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव
    केंद्रीय आयुष तथा स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव ने कहा कि आयुर्वेद केवल उपचार पद्धति नहीं, बल्कि स्वस्थ जीवन जीने का मार्ग है। दिनचर्या, ऋतुचर्या, उचित आहार-विहार और योग के माध्यम से स्वस्थ जीवनशैली को बढ़ावा देना आवश्यक है।
    उन्होंने कहा कि आयुर्वेद को आधुनिक अनुसंधान और प्रौद्योगिकी से जोड़कर देश की स्वास्थ्य व्यवस्था को अधिक सक्षम बनाने पर जोर दिया जा रहा है। उन्होंने जानकारी दी कि देश के प्रत्येक जिले में 50 बिस्तरों वाले आयुर्वेदिक अस्पताल स्थापित किए जाने की योजना है।
    उन्होंने कहा कि आयुर्वेदिक औषधीय पौधों के संरक्षण से स्वास्थ्य के साथ-साथ पर्यावरण, कृषि, रोजगार और ग्रामीण अर्थव्यवस्था को भी बढ़ावा मिल सकता है। उन्होंने स्वस्थ, आत्मनिर्भर और समृद्ध भारत के निर्माण के लिए सामूहिक प्रयास करने का आह्वान किया।
    आयुर्वेद को आधुनिक वैज्ञानिक अनुसंधान से जोड़ना आवश्यक – केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक
    केंद्रीय विद्युत तथा नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक ने कहा कि आयुर्वेद भारत की ओर से विश्व को मिली एक अमूल्य देन है। पारंपरिक ज्ञान को आधुनिक वैज्ञानिक अनुसंधान, प्रमाण-आधारित निष्कर्षों और क्लिनिकल आंकड़ों से जोड़ना आवश्यक है। इससे राष्ट्रीय और वैश्विक स्वास्थ्य व्यवस्था में आयुर्वेद को प्रभावी स्थान प्राप्त करने में मदद मिलेगी।
    उन्होंने कहा कि आयुर्वेद शिक्षा, अनुसंधान, कौशल विकास और अंतरराष्ट्रीय स्तर पर इसके प्रचार-प्रसार के लिए विभिन्न पहल करने की आवश्यकता है। आयुर्वेद के प्राचीन ज्ञान को आधुनिक विज्ञान से जोड़ते हुए सक्षम शिक्षण एवं अनुसंधान संस्थानों का निर्माण किया जाना चाहिए। आयुर्वेद और आधुनिक चिकित्सा को परस्पर पूरक रूप में कार्य करना चाहिए तथा रोगियों की सुरक्षा और वैज्ञानिक प्रमाणों को प्राथमिकता दी जानी चाहिए।
    आयुर्वेद के प्रचार-प्रसार के लिए व्यापक प्रयास आवश्यक – डॉ. विनायक तायडे
    विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र के अध्यक्ष डॉ. विनायक तायडे ने कहा कि आयुर्वेद के प्रचार-प्रसार के लिए देशभर में विभिन्न पहल की जा रही हैं। उन्होंने आयुर्वेदिक उपचार पद्धति को राष्ट्रीय उपचार पद्धति का दर्जा देने की मांग की। उन्होंने आयुर्वेद के ज्ञान को अधिकाधिक लोगों तक पहुंचाने के लिए वैद्यों, शोधकर्ताओं, विद्यार्थियों और विभिन्न संस्थानों से मिलकर कार्य करने का आह्वान किया।
    इस अवसर पर राज्यपाल जिष्णु देव वर्मा के हाथों डॉ. मधुभाई कोठारी को आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार, डॉ. स्वप्नील पदते को युवा धन्वंतरी पुरस्कार तथा मूलराज वडोर को आयुर्वेद उद्यमी पुरस्कार प्रदान किया गया।