बंद

    30.09.2026: तरुणांनी टीबीविषयी जनजागृतीचे दूत बनावे; सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रकाशित तारीख : September 30, 2026
    30.09.2026:  क्षयरोग (टीबी) हा केवळ आजार नसून सामाजिक समस्या आहे. टीबीमुक्त मुंबईसाठी शासनाच्या प्रयत्नांसोबत समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृतीचे दूत बनावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. 
भारतीय विद्या भवन कॉलेज, अंधेरी पश्चिम येथे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भवन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई जनजागृती पदयात्रेत’ सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, भवन्स कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. असिफ मुल्ला, प्राचार्या प्रा. (डॉ.) सविता पवार, अभिनेता अपारशक्ती खुराणा, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांच्यासह शिक्षकवृंद, NSS स्वयंसेवक, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    30.09.2026

    तरुणांनी टीबीविषयी जनजागृतीचे दूत बनावे; सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेण्याचे राज्यपालांचे आवाहन

    टीबीमुक्त मुंबईसाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भवन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती फेरी

    मुंबई, दि. ३० सप्टेंबर : क्षयरोग (टीबी) हा केवळ आजार नसून सामाजिक समस्या आहे. टीबीमुक्त मुंबईसाठी शासनाच्या प्रयत्नांसोबत समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृतीचे दूत बनावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. भवन कॉलेज, अंधेरी पश्चिम येथे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भवन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई जनजागृती पदयात्रेत’ राज्यपाल सहभागी झाले.

    यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, देशाचे भविष्य सरकारी कार्यालयांमध्ये नव्हे, तर शाळा-महाविद्यालये, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या कार्यातून घडत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसोबतच मजबूत आणि संवेदनशील समाज निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. चांगल्या समाजाशिवाय व्यक्तीचे चांगले भविष्य घडू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

    टीबीमुक्त समाजासाठी जनजागृती आवश्यक

    टीबी उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, आजही अनेक नागरिकांमध्ये या आजाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे रुग्ण आजार लपवतात. त्यामुळे वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि औषधांचा नियमित वापर याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. सरकारकडून टीबी रुग्णांसाठी तपासणी, औषधे आणि पोषणासह आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    टीबीमुक्त मुंबईसाठी केवळ शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांवर अवलंबून राहता येणार नाही. विद्यार्थ्यांनी कुटुंब, महाविद्यालय, परिसर आणि समाजात टीबीविषयी सकारात्मक संदेश पोहोचवावा. ‘घाबरू नका, तपासणी करा, उपचार घ्या आणि निरोगी जीवन जगा’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

    संवेदनशील नागरिक घडविण्याची गरज

    समाजाच्या उभारणीसाठी संवेदनशील नागरिकांची आवश्यकता असून, त्यासाठी मोठे आर्थिक योगदान नव्हे तर वेळ, सहानुभूती आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखाची काळजी घेणे हीच चांगल्या नागरिकाची ओळख आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी त्यांनी तरुणांपुढील पर्यावरण, हवामान बदल, प्लास्टिक आणि वाढता स्क्रीन टाइम यांसारख्या नव्या आव्हानांचाही उल्लेख केला. ‘विकसित भारत’ हा केवळ आर्थिक प्रगतीवर नव्हे, तर नागरिकांची जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यावरही आधारित असला पाहिजे. २०४७ च्या विकसित भारताचा मजबूत पाया घालण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

    राज्यपालांनी ‘क्रांती म्हणजे सकारात्मक रूपांतर’ असल्याचे सांगत, एका व्यक्तीचे जीवन बदलणे हीदेखील छोटी क्रांती आहे आणि अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांतून मोठे सामाजिक परिवर्तन घडते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

    ‘टीबीमुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ आणि लोप पावत चाललेल्या कलांचे जतन
    – राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या सहभागासाठी ‘टीबीमुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ आणि लोप पावत चाललेल्या कलांचे जतन ही तीन प्रमुख क्षेत्रे निश्चित केली आहेत. ‘टीबीमुक्त मुंबई’ मोहिमेचा उद्देश नागरिक, विशेषतः तरुणांना सहभागी करून जनजागृती आणि लोकसहभाग वाढविणे हा आहे.

    टीबी हा प्रतिबंधात्मक आणि उपचाराने पूर्ण बरा होणारा आजार असून, वेळेवर निदान व उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरुणांनी आपल्या कुटुंबात, महाविद्यालयात, परिसरात आणि समाजमाध्यमांद्वारे टीबीविषयी जनजागृती करावी आणि आरोग्य जागृतीचे दूत बनावे, असे डॉ. नारनवरे यांनी आवाहन केले.

    तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे – अभिनेता अपारशक्ती खुराणा

    अभिनेता अपारशक्ती खुराणा यांनी टीबीमुक्त मुंबई उपक्रमाचे कौतुक करताना ‘नशेला नाही म्हणणे’ ही प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी असल्याचे सांगितले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होतो, असे त्यांनी नमूद केले.

    आपल्या वडिलांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शिकवण दिली आणि त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला, असे सांगत खुराणा यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या कामावर तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंधांवर होतो, असे त्यांनी सांगितले.

    रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या कवितेचा संदर्भ देत, व्यसनामुळे माणसाचा विवेक नष्ट होतो, त्यामुळे तरुणांनी स्वतःचे नुकसान करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
    सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचा आनंद व्यक्त करत, समाज अधिक चांगला आणि जबाबदार बनविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, भवन कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. असिफ मुल्ला, भवन कॉलेजच्या प्राचार्या प्रा. (डॉ.) सविता पवार, अभिनेता अपारशक्ती खुराणा, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांच्यासह शिक्षकवृंद, NSS स्वयंसेवक, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भवन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह टीबीमुक्त मुंबई जनजागृती पदयात्रेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी टीबीविषयी जनजागृती करणारे संदेश देत समाजात आरोग्य जागृती आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश पोहोचविला.

    **

    युवाओं को टीबी के प्रति जनजागरूकता का दूत बनने का राज्यपाल का आह्वान

    टीबी मुक्त मुंबई के लिए राज्यपाल जिष्णु देव वर्मा की भवन कॉलेज के विद्यार्थियों के साथ जनजागरूकता पदयात्रा

    मुंबई, दि. 30 सितंबर : क्षय रोग (टीबी) केवल एक बीमारी नहीं, बल्कि एक सामाजिक समस्या भी है। टीबी मुक्त मुंबई के लिए सरकार के प्रयासों के साथ समाज के प्रत्येक वर्ग, विशेषकर युवाओं को आगे आकर जनजागरूकता का दूत बनना चाहिए, यह आह्वान महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया। भवन कॉलेज, अंधेरी पश्चिम में मुंबई विश्वविद्यालय की राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), बृहन्मुंबई महानगरपालिका और भवन कॉलेज के संयुक्त तत्वावधान में आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई जनजागरूकता पदयात्रा’ में राज्यपाल सहभागी हुए।

    इस अवसर पर विद्यार्थियों से संवाद करते हुए राज्यपाल ने कहा कि देश का भविष्य केवल सरकारी कार्यालयों में नहीं, बल्कि स्कूलों-महाविद्यालयों, प्रयोगशालाओं और युवाओं के कार्यों से आकार ले रहा है। विद्यार्थियों को अपने करियर के साथ-साथ एक मजबूत और संवेदनशील समाज के निर्माण की जिम्मेदारी भी स्वीकार करनी चाहिए। अच्छे समाज के बिना व्यक्ति का उज्ज्वल भविष्य संभव नहीं है।

    टीबी मुक्त समाज के लिए जनजागरूकता आवश्यक

    टीबी का पूर्ण उपचार संभव है। लेकिन आज भी अनेक नागरिकों में इस बीमारी के बारे में पर्याप्त जानकारी नहीं होने तथा सामाजिक कलंक के भय के कारण मरीज बीमारी को छिपाते हैं। इसलिए समय पर जांच, उचित उपचार और दवाओं के नियमित सेवन के बारे में जनजागरूकता आवश्यक है। सरकार की ओर से टीबी मरीजों के लिए जांच, दवाइयों और पोषण सहित आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराई जा रही हैं। नागरिकों को इन सुविधाओं का लाभ उठाना चाहिए, ऐसा आह्वान राज्यपाल ने किया।

    टीबी मुक्त मुंबई के लिए केवल सरकारी तंत्र के प्रयासों पर निर्भर नहीं रहा जा सकता। विद्यार्थियों को अपने परिवार, कॉलेज, आसपास के क्षेत्र और समाज में टीबी के प्रति सकारात्मक संदेश पहुंचाना चाहिए। ‘डरें नहीं, जांच कराएं, उपचार लें और स्वस्थ जीवन जिएं’ यह संदेश समाज के प्रत्येक वर्ग तक पहुंचाने का उन्होंने आह्वान किया।

    संवेदनशील नागरिकों के निर्माण की आवश्यकता

    समाज के निर्माण के लिए संवेदनशील नागरिकों की आवश्यकता है। इसके लिए बड़े आर्थिक योगदान से अधिक समय, सहानुभूति और सामाजिक प्रतिबद्धता महत्वपूर्ण है। समाज के प्रत्येक वर्ग के सुख-दुःख की चिंता करना ही एक अच्छे नागरिक की पहचान है, राज्यपाल ने कहा।

    उन्होंने युवाओं के सामने पर्यावरण, जलवायु परिवर्तन, प्लास्टिक और बढ़ते स्क्रीन टाइम जैसी नई चुनौतियों का भी उल्लेख किया। ‘विकसित भारत’ केवल आर्थिक प्रगति पर नहीं, बल्कि नागरिकों की जागरूकता और सामाजिक प्रतिबद्धता पर भी आधारित होना चाहिए। वर्ष 2047 के विकसित भारत की मजबूत नींव रखने की जिम्मेदारी आज की युवा पीढ़ी पर है, उन्होंने कहा।

    राज्यपाल ने कहा कि ‘क्रांति का अर्थ सकारात्मक परिवर्तन है।’ किसी एक व्यक्ति का जीवन बदलना भी एक छोटी क्रांति है और ऐसे छोटे-छोटे प्रयासों से बड़ा सामाजिक परिवर्तन संभव है।

    ‘टीबी मुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ और लुप्त होती कलाओं का संरक्षण
    — राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने कहा कि राज्यपाल ने पदभार ग्रहण करने के बाद नागरिकों की सहभागिता के लिए ‘टीबी मुक्त मुंबई’, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ और लुप्त होती कलाओं का संरक्षण—इन तीन प्रमुख क्षेत्रों को प्राथमिकता दी है। ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान का उद्देश्य नागरिकों, विशेषकर युवाओं को सहभागी बनाकर जनजागरूकता और जनभागीदारी बढ़ाना है।

    टीबी एक रोकथाम योग्य और उपचार से पूरी तरह ठीक होने वाली बीमारी है तथा समय पर निदान और उपचार अत्यंत महत्वपूर्ण हैं। युवाओं को अपने परिवार, कॉलेज, आसपास के क्षेत्र और सोशल मीडिया के माध्यम से टीबी के प्रति जागरूकता फैलानी चाहिए और स्वास्थ्य जागरूकता के दूत बनना चाहिए, ऐसा आह्वान डॉ. नारनवरे ने किया।

    युवाओं को नशे से दूर रहना चाहिए – अभिनेता अपारशक्ति खुराना

    अभिनेता अपारशक्ति खुराना ने टीबी मुक्त मुंबई पहल की सराहना करते हुए कहा कि ‘नशे को ना कहना’ प्रत्येक व्यक्ति की मूल जिम्मेदारी है। मानसिक और शारीरिक रूप से स्वस्थ रहने का सकारात्मक प्रभाव व्यक्ति के व्यक्तिगत और व्यावसायिक जीवन पर पड़ता है।

    उन्होंने कहा कि उनके पिता ने उन्हें नशे से दूर रहने की सीख दी, जिसका उनके जीवन पर सकारात्मक प्रभाव पड़ा। युवाओं को नशे से दूर रहकर अपने भविष्य के लिए सही निर्णय लेना चाहिए। मानसिक और शारीरिक स्वास्थ्य का सकारात्मक प्रभाव व्यक्ति के कार्य तथा व्यक्तिगत और व्यावसायिक संबंधों पर भी पड़ता है।

    रामधारी सिंह ‘दिनकर’ की कविता का संदर्भ देते हुए उन्होंने कहा कि नशा व्यक्ति का विवेक नष्ट करता है। इसलिए युवाओं को अपने जीवन को नुकसान पहुंचाने वाले पदार्थों से दूर रहना चाहिए।

    सामाजिक उपक्रमों में सहभागी होने का अवसर मिलने पर प्रसन्नता व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि समाज को बेहतर और अधिक जिम्मेदार बनाने के लिए सभी को अपना योगदान देना चाहिए।

    इस अवसर पर मुंबई विश्वविद्यालय के कुलगुरु प्रो. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, प्रति-कुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, भवन कॉलेज की गवर्निंग काउंसिल के अध्यक्ष एडवोकेट आसिफ मुल्ला, भवन कॉलेज की प्राचार्या प्रो. (डॉ.) सविता पवार, अभिनेता अपारशक्ति खुराना, मेघाश्रेय फाउंडेशन की संस्थापक सीमा सिंह सहित शिक्षकगण, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कैडेट्स और बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित थे।

    कार्यक्रम के बाद राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने भवन कॉलेज के विद्यार्थियों के साथ टीबी मुक्त मुंबई जनजागरूकता पदयात्रा में सहभागिता की। विद्यार्थियों ने टीबी के प्रति जनजागरूकता के संदेश देते हुए समाज में स्वास्थ्य जागरूकता और सामाजिक संवेदनशीलता का संदेश पहुंचाया।