30.10.2026: जम्मू-काश्मीर व लडाख भारताचा मुकुट: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
30 ऑक्टोबर २०२6
जम्मू-काश्मीर व लडाख भारताचा मुकुट: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
लोकभवन येथे जम्मू-काश्मीर व लडाख स्थापना दिन साजरा
मुंबई, दि. ३० : जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा मुकुट असून प्रत्येक भारतीयाच्या मनात या प्रदेशाबद्दल विशेष स्थान आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ म्हणजे एकसारखेपणा नाही, तर हृदयांची, मनांची आणि दृष्टीची एकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) जम्मू-काश्मीर आणि लडाख स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. स्थापना दिन दि. ३१ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस आधी घेण्यात आल्याचे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जीएचआरटी इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. एच. आर. रहमान, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, कुलसचिव गणेश भोरकडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जम्मू काश्मीर येथून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले ‘युवा संगम-७’ चे सदस्य, जम्मू-काश्मीर डोगरा समाज आणि काश्मिरी पंडित असोसिएशनचे सदस्य, चित्रपट कलावंत, विद्यार्थी आणि जम्मू-काश्मीरचे मुंबईस्थित मान्यवर उपस्थित होते.
पृथ्वीवरील स्वर्ग
राज्यपाल म्हणाले, “जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील डोंगर, सुंदर दऱ्या, सरोवरे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आपल्या देशाचे सौंदर्य दाखवतात. पृथ्वीवर स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, असे म्हटले जाते. काश्मीरचे लोक प्रेमळ आणि आपुलकीने स्वागत करणारे आहेत. तिथल्या हस्तकला आणि कलावस्तू जगभर प्रसिद्ध आहेत. लडाखला भेट देणे हे अनेकांचे स्वप्न असते. आज सर्वच प्रदेश प्रगतीच्या मार्गावर आहे.”
एकसारखेपणा नव्हे, एकता
विविध राज्यांचे स्थापना दिन सर्वत्र साजरे करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. आपण कुठेही असलो, तरी एकमेकांची संस्कृती जाणून घ्यावी, हा यामागचा उद्देश असल्याचे राज्यपाल म्हणाले. “एक भारत म्हणजे एकसारखेपणा नाही. ही हृदयांची, मनांची आणि देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीची एकता आहे. एकत्र काम करून यश मिळवण्याची ही एकता आहे. एकसारखेपणा निसर्गात नाही. फुले, झाडे, प्राणी वेगवेगळे आहेत, तरीही सर्वांत एक प्रकारची एकता आहे. ही एकता भारताच्या विविध संस्कृतींतून उत्तम दिसते.”
ईशान्य भारताचे उदाहरण देताना राज्यपाल म्हणाले, “ईशान्य भारत हा अतिशय वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. दर काही किलोमीटरवर वेगळी भाषा आणि वेगळ्या परंपरा दिसतात. काश्मीर आणि लडाखची नृत्ये, भाषा आणि मूल्यव्यवस्था, तसेच इतर राज्यांच्या संस्कृती एकत्र येऊन भारताची ओळख घडवतात. कोणतीही एक संस्कृती आपली सभ्यता ठरवत नाही. सर्व संस्कृती मिळून भारतीय सभ्यता घडवतात. सर्व संस्कृती आणि भाषांचा हा संगम म्हणजेच ‘भारतीयता’. ही भावना देशभरातील सर्व लोकभवनांमध्ये साजरी केली जाते.”
मुळे जितकी खोल, तितका वृक्ष उंच
राज्यपाल म्हणाले, “आपण कुठेही राहिलो, तरी आपल्या मूळ राज्याला विसरत नाही. आपले बालपण तिथे गेलेले असते आणि आपली मुळे तिथे खोलवर असतात. वृक्ष कितीही मोठा झाला, तरी त्याचे पोषण मुळेच करतात. वृक्ष जितका उंच, तितकी त्याची मुळे खोल जातात. समाजही निसर्गाचेच प्रतिबिंब आहे. आपण आपल्या मुळांचे पोषण करतो, तेव्हा आपलेच पोषण होते आणि आयुष्यात पुढे जाताना मनही समृद्ध होते.” काश्मीर, जम्मू आणि लडाखची संस्कृती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी, असे राज्यपाल म्हणाले. वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ राज्याचा स्थापना दिन आनंदाने साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “जिथे हृदय, तेच घर” असे ते म्हणाले. इतिहास, संस्कृती, नृत्य, गीत, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलांनी समृद्ध असलेले हे प्रदेश देशाचे गौरवशाली घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील कलावंतांनी, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अभ्युदय नगर, काळाचौकी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी कलाकारांनी काश्मीरचे रौफ लोकनृत्य तसेच लडाखचे जाबरो व शोंडोल गीत-लोकनृत्य सादर केले. समारोप मिशन काश्मीर मधील बूमरो बूमरो श्याम रंग गीताने झाला. राज्यपालांनी सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले.
या कलावंतांना महाराष्ट्रात आणल्याबद्दल राज्यपालांनी जीएचआरटी इंटरनॅशनलचे अभिनंदन केले. संस्मरणीय कार्यक्रमासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा आणि प्रशासनाचेही अभिनंदन केले. ‘युवा संगम-७’ मधील युवकांचे आणि त्यांचे यजमान असलेल्या आयआयटी मुंबईचे त्यांनी स्वागत केले. मूळ जम्मू-काश्मीर आणि लडाखचे जे लोक महाराष्ट्रात राहतात, त्यांच्याशिवाय हा उत्सव अपूर्ण राहिला असता, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात जम्मू काश्मीर येथील डॉ एजाज अशाई, फिक्की फ्लोच्या अध्यक्षा अरुणा आनंद, जीएचआरटी इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष डॉ एच आर रहमान, वैज्ञानिक प्रो. मामिडांना श्रीधर, कृपानिधी बिस्वाल, लेस्ली त्रिपाठी, डॉ दत्तात्रय काटे, डॉ नीरज शाह, संगीता ठाकूर, अभिनेते तेज सप्रू, प्रीती सप्रू, अभिनेते मुकेश ऋषी, अश्वथ भट्ट, मुस्कान गोस्वामी, महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, डोगरा समाज व काश्मिरी पंडित समाज संस्थेचे प्रतिनिधी, एनआयटी श्रीनगरचे डॉ अशोक कुमार, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रो मिलिंद अत्रे आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
—
Shri. Prashant Odhe, DGIPR
जम्मू-कश्मीर और लद्दाख भारत का मुकुट हैं : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
लोकभवन में जम्मू-कश्मीर एवं लद्दाख स्थापना दिवस उत्साहपूर्वक मनाया गया
मुंबई, 30 अक्टूबर : जम्मू-कश्मीर और लद्दाख भारत का मुकुट हैं तथा प्रत्येक भारतीय के हृदय में इन क्षेत्रों का विशेष स्थान है। ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ का अर्थ एकरूपता नहीं, बल्कि हृदयों, विचारों और दृष्टिकोण की एकता है। यह प्रतिपादन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया।
केंद्र सरकार के ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान के अंतर्गत महाराष्ट्र लोकभवन में शुक्रवार (30 अक्टूबर) को जम्मू-कश्मीर और लद्दाख स्थापना दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर राज्यपाल संबोधित कर रहे थे। स्थापना दिवस 31 अक्टूबर को होता है, लेकिन राष्ट्रपति के नाशिक दौरे के कारण यह कार्यक्रम एक दिन पहले आयोजित किया गया।
कार्यक्रम में बृहन्मुंबई महानगरपालिका की शिक्षा समिति की अध्यक्ष राजश्री शिरवाडकर, पूर्व महापौर श्रद्धा जाधव, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जीएचआरटी इंटरनेशनल के अध्यक्ष डॉ. एच. आर. रहमान, आईआईटी मुंबई के उपनिदेशक प्रो. मिलिंद अत्रे, कुलसचिव गणेश भोरकड़े सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
जम्मू-कश्मीर से महाराष्ट्र के दौरे पर आए ‘युवा संगम-7’ के सदस्य, जम्मू-कश्मीर डोगरा समाज और कश्मीरी पंडित एसोसिएशन के प्रतिनिधि, फिल्म कलाकार, विद्यार्थी तथा मुंबई में रहने वाले जम्मू-कश्मीर के गणमान्य नागरिक भी कार्यक्रम में शामिल हुए।
धरती पर स्वर्ग
राज्यपाल ने कहा, “जम्मू-कश्मीर और लद्दाख के पहाड़, खूबसूरत घाटियां, झीलें और समृद्ध सांस्कृतिक विरासत हमारे देश की सुंदरता को दर्शाती हैं। कहा जाता है कि यदि धरती पर कहीं स्वर्ग है, तो वह यहीं है। कश्मीर के लोग प्रेमपूर्ण और आत्मीयता से स्वागत करने वाले हैं। वहां की हस्तकलाएं और कलाकृतियां पूरी दुनिया में प्रसिद्ध हैं। लद्दाख की यात्रा करना अनेक लोगों का सपना होता है। आज ये सभी क्षेत्र प्रगति के मार्ग पर आगे बढ़ रहे हैं।”
एकरूपता नहीं, बल्कि एकता
राज्यपाल ने कहा कि विभिन्न राज्यों के स्थापना दिवस पूरे देश में मनाने की संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने प्रस्तुत की थी। इसका उद्देश्य यह है कि हम देश के किसी भी हिस्से में रहें, लेकिन एक-दूसरे की संस्कृति को जानें और समझें।
उन्होंने कहा, “एक भारत का अर्थ एकरूपता नहीं है। यह हृदयों, विचारों और देश को आगे ले जाने के दृष्टिकोण की एकता है। मिलकर काम करते हुए सफलता प्राप्त करने की भावना ही वास्तविक एकता है। प्रकृति में भी एकरूपता नहीं है। फूल, पेड़ और जीव-जंतु अलग-अलग हैं, फिर भी उनमें एक प्रकार की एकता दिखाई देती है। भारत की विविध संस्कृतियों में यह एकता खूबसूरती से दिखाई देती है।”
पूर्वोत्तर भारत का उदाहरण देते हुए राज्यपाल ने कहा, “पूर्वोत्तर भारत अत्यंत विविधतापूर्ण क्षेत्र है। हर कुछ किलोमीटर पर अलग भाषा और अलग परंपराएं देखने को मिलती हैं। कश्मीर और लद्दाख के नृत्य, भाषाएं और मूल्य व्यवस्था तथा अन्य राज्यों की संस्कृतियां मिलकर भारत की पहचान बनाती हैं। कोई एक संस्कृति हमारी सभ्यता को परिभाषित नहीं