बंद

    31.10.2026: राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : October 31, 2026
    31.10.2026: देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली  वाहून अभिवादन केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांजली वाहून अभिवादन केले.   सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी लोकभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली, तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चीत करण्यासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला.  यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे  सह सचिव एस. राममूर्ती तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोक भवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

    राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

    राज्यपालांकडून उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ

    देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
    सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी लोकभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

    यावेळी उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली, तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चीत करण्यासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प केला.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोक भवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

    राज्यपाल ने सरदार वल्लभभाई पटेल और इंदिरा गांधी को दी श्रद्धांजलि
    राष्ट्रीय एकता की शपथ दिलाई

    देश के पूर्व उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल की 151वीं जयंती के अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने लोकभवन में सरदार पटेल के चित्र पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी।
    पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की 42वीं पुण्यतिथि के अवसर पर राज्यपाल ने उनके चित्र पर भी पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी।

    सरदार वल्लभभाई पटेल की जयंती को राष्ट्रीय एकता दिवस के रूप में मनाया जाता है। इस अवसर पर राज्यपाल ने लोकभवन के अधिकारियों एवं कर्मचारियों को राष्ट्रीय एकता की शपथ दिलाई।

    इस दौरान उपस्थित सभी लोगों ने देश की एकता, अखंडता और सुरक्षा बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करने की शपथ ली। साथ ही देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने में अपना योगदान देने का संकल्प भी लिया।

    इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल के संयुक्त सचिव एस. राममूर्ति, लोकभवन के अधिकारी एवं कर्मचारी तथा लोकभवन में तैनात पुलिस अधिकारी और जवान उपस्थित थे।