29.07.2026: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव गिते यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी (दि. २९ जुलै ) डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
डॉ. गिते यांनी सन २००१ साली एम.एस. (शल्यचिकित्सा) आणि २०१० मध्ये डीएनबी (युरोलॉजी) ही पदवी प्राप्त केली. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी ब्लॉक, छत्रपती संभाजीनगर येथे युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.
शासकीय व्यवस्थेत कॅडव्हर किडनी प्रत्यारोपण (Cadaver Renal Transplant) कार्यक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमाचे ते सल्लागार सदस्य आहेत.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही डॉ. गिते यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या नावावर ५३ संशोधन निबंध आणि ६ पुस्तके प्रकाशित आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी योग्य उमेदवाराची शिफारस करण्यासाठी राज्यपालांनी डॉ. सी. ई. ईपन, प्राध्यापक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव धीरज कुमार आणि राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनुपकुमार आर. अन्वीकर यांचा समावेश होता.
समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. वेंकट गिते यांच्या नावाची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.
**
स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलपति पद पर डॉ. वेंकट गिते की नियुक्ति
नासिक के शासकीय मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट शाहूबाई अर्जुनराव गिते को महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय (MUHS), नासिक का नया कुलपति नियुक्त किया गया है।
महाराष्ट्र के राज्यपाल एवं राज्य के विश्वविद्यालयों के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने बुधवार (29 जुलाई) को डॉ. वेंकट गिते की कुलपति पद पर नियुक्ति की घोषणा की। उनकी नियुक्ति पांच वर्ष की अवधि के लिए की गई है।
लेफ्टिनेंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर का कुलपति के रूप में कार्यकाल 14 अक्टूबर 2025 को समाप्त होने के बाद यह पद रिक्त हो गया था। इसके पश्चात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय के कुलपति प्रो. संजीव सोनवणे को महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलपति पद का अतिरिक्त प्रभार सौंपा गया था।
डॉ. गिते ने वर्ष 2001 में एम.एस. (शल्य चिकित्सा) तथा वर्ष 2010 में डीएनबी (यूरोलॉजी) की उपाधि प्राप्त की। उन्होंने शासकीय मेडिकल कॉलेज एवं सुपर स्पेशियलिटी ब्लॉक, छत्रपति संभाजीनगर में यूरोलॉजी विभाग के प्रोफेसर एवं विभागाध्यक्ष के रूप में सेवाएं दी हैं। वर्तमान में वे शासकीय मेडिकल कॉलेज, नासिक के अधिष्ठाता (डीन) के रूप में कार्यरत हैं।
सरकारी स्वास्थ्य व्यवस्था में कैडेवर किडनी प्रत्यारोपण (Cadaver Renal Transplant) कार्यक्रम की शुरुआत करने में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। इसके अलावा वे महाराष्ट्र शासन के स्वास्थ्य विभाग के अंग प्रत्यारोपण कार्यक्रम के सलाहकार सदस्य भी हैं।
चिकित्सा शिक्षा एवं अनुसंधान के क्षेत्र में भी डॉ. गिते का उल्लेखनीय योगदान रहा है। उनके नाम पर 53 शोध-पत्र तथा 6 पुस्तकें प्रकाशित हैं।
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय के कुलपति पद के लिए उपयुक्त उम्मीदवार की अनुशंसा करने हेतु राज्यपाल ने डॉ. सी. ई. ईपन, प्रोफेसर, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर की अध्यक्षता में एक खोज समिति (सर्च कमेटी) का गठन किया था। समिति में चिकित्सा शिक्षा एवं औषधि विभाग के सचिव धीरज कुमार तथा आईसीएमआर–राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान के निदेशक डॉ. अनुपकुमार आर. अन्वीकर सदस्य थे।
समिति द्वारा अनुशंसित सभी उम्मीदवारों के व्यक्तिगत साक्षात्कार लेने के बाद राज्यपाल एवं कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने डॉ. वेंकट गिते के नाम की कुलपति पद पर नियुक्ति की घोषणा की।
**