बंद

    19.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत ब्रह्माकुमारींच्या व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचे उदघाटन

    प्रकाशित तारीख : August 20, 2026
    19.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे’ उद्घाटन केले. यावेळी विविध महाविद्यालयांमधून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना राज्यपालांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली तसेच ‘नशामुक्ती अभियान व्हॅन’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासकीय प्रमुख राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे प्रमुख बी. के. बनारसी लाल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, ब्रह्माकुमारीजच्या विविध केंद्रांतील बंधू व भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी मुंबईतर्फे सुरू करण्यात आलेल्या या महाअभियानाचा उद्देश युवकांमध्ये अमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती निर्माण करणे तसेच व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

    राज्यपालांच्या उपस्थितीत ब्रह्माकुमारींच्या व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचे उदघाटन ।

    शेकडो विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा

    ब्रह्माकुमारींनी व्यसनमुक्ती अभियान शाळा – महाविद्यालये – विद्यापीठांमध्ये राबवावे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मादक पदार्थांची व्यसनाधीनता ही केवळ आरोग्याची समस्या नाही तर ते गंभीर सामाजिक व राष्ट्रीय आव्हान आहे. मादक पदार्थांमुळे व्यक्तीचे जीवन तर उद्ध्वस्त होतेच परंतु कुटुंब आणि समाजासमोर गंभीर आव्हान निर्माण होते. एकटे शासन या आव्हानाला तोंड देऊ शकत नाही; त्यासाठी लोकसहभाग अतिशय आवश्यक आहे असे सांगून ब्रह्माकुमारी या संस्थेने व्यसनमुक्ती अभियान शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये राबवावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी येथे केले.

    ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे’ उदघाटन राज्यपाल देव वर्मा यांनी बुधवारी (दि. १९) एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात केले, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी विविध महाविद्यालयांमधून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना राज्यपालांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली तसेच ‘नशामुक्ती अभियान’ वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

    पंतप्रधानांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ सुरु केल्यावर त्याला प्रतिसाद देत ब्रह्माकुमारी संस्थेने लगेचच ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा’ अभियान हाती घेतल्याबद्दल ब्रह्माकुमारींचे अभिनंदन करताना व्यसनाधीनता हे देशापुढील मोठे आव्हान असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    उत्तर पूर्व राज्यांना मोठी आंतरराष्ट्रीय सीमा असल्यामुळे ही राज्ये फार पूर्वीपासून अंमली पदार्थ तस्करीच्या समस्येला तोंड देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    मादक पदार्थांच्या व्यापाराला ‘मागणी’ व ‘पुरवठा’ असे दोन पैलू आहेत. पुरवठा थांबवण्यासाठी पोलीस तसेच इतर यंत्रणा काम करीत आहेत. परंतु अमली पदार्थांची मागणी होऊ नये यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    ब्रह्मकुमारी संस्थेने समाजासोबत काम केले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना खेळ, योग, अध्यात्म, ध्यानधारणा आदी सकारात्मक कार्यात गुंतवले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

    ब्रह्माकुमारींच्या राजयोगामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले. नशेविरुद्ध लढा हे एक प्रकारचे धर्मयुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

    पूर्वी शत्रूराष्ट्र शस्त्रास्त्र तसेच दारुगोळा यांच्या माध्यमातून युद्ध करीत. परंतु आज ती राष्ट्रे नकली नोटा तसेच मादक पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून देश अस्थिर करीत आहेत. अश्यावेळी कुटुंब संस्था मजबूत केली पाहिजे असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

    ब्रह्माकुमारी संस्था महिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी जागतिक संस्था असून आज ती १४० हून अधिक देशात लोकांना संस्कारित करीत आहे. संस्थेच्या हजारो भगिनी व बांधव व्यसनमुक्ती अभियानात मोठे योगदान देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

    ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त प्रशासकीय प्रमुख संतोष दिदी यांनी प्रास्ताविक केले, तर वैद्यकीय विभागाचे प्रमुख बनारसी लाल यांनी आभार प्रदर्शन केले.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, ब्रह्माकुमारीजच्या विविध केंद्रांतील बंधू व भगिनी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

    **

    राज्यपाल की उपस्थिति में ब्रह्माकुमारीज के नशामुक्ति प्रतिज्ञा अभियान का शुभारंभ

    सैकड़ों विद्यार्थियों ने ली नशामुक्ति की शपथ

    ब्रह्माकुमारीज नशामुक्ति अभियान को स्कूलों, कॉलेजों और विश्वविद्यालयों तक ले जाएँ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    नशीले पदार्थों की लत केवल स्वास्थ्य संबंधी समस्या नहीं है, बल्कि यह एक गंभीर सामाजिक और राष्ट्रीय चुनौती है।

    नशीले पदार्थों के सेवन से व्यक्ति का जीवन तो बर्बाद होता ही है, साथ ही परिवार और समाज के सामने भी गंभीर चुनौतियाँ उत्पन्न होती हैं।

    इस चुनौती का सामना केवल सरकार अकेले नहीं कर सकती, इसके लिए जनभागीदारी अत्यंत आवश्यक है।

    ब्रह्माकुमारीज संस्था को नशामुक्ति अभियान को स्कूलों, कॉलेजों और विश्वविद्यालयों तक ले जाना चाहिए, यह आह्वान महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया।

    ब्रह्माकुमारीज संस्था द्वारा आयोजित ‘10 करोड़ नशामुक्ति प्रतिज्ञा महाअभियान’ का शुभारंभ राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा ने बुधवार (19 अगस्त) को एसएनडीटी महिला विश्वविद्यालय के पाटकर सभागार में किया। इस अवसर पर वे संबोधित कर रहे थे।

    इस अवसर पर विभिन्न महाविद्यालयों से आए सैकड़ों विद्यार्थियों को राज्यपाल ने नशामुक्ति की शपथ दिलाई तथा ‘नशामुक्ति अभियान’ वाहन को हरी झंडी दिखाकर रवाना किया।

    प्रधानमंत्री द्वारा ‘नशामुक्त भारत अभियान’ शुरू किए जाने के बाद उसके प्रति सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए ब्रह्माकुमारीज संस्था ने तत्काल ‘10 करोड़ नशामुक्ति प्रतिज्ञा’ अभियान शुरू किया, इसके लिए ब्रह्माकुमारीज का अभिनंदन करते हुए राज्यपाल ने कहा कि नशे की लत देश के सामने एक बड़ी चुनौती है।

    राज्यपाल ने कहा कि पूर्वोत्तर राज्यों की अंतरराष्ट्रीय सीमाएँ लंबी होने के कारण ये राज्य लंबे समय से मादक पदार्थों की तस्करी की समस्या का सामना कर रहे हैं।

    मादक पदार्थों के व्यापार के दो प्रमुख पहलू हैं—‘मांग’ और ‘आपूर्ति’।

    आपूर्ति रोकने के लिए पुलिस तथा अन्य सरकारी एजेंसियाँ काम कर रही हैं। लेकिन मादक पदार्थों की मांग ही न पैदा हो, इसके लिए समाज को सक्रिय रूप से प्रयास करने होंगे, राज्यपाल ने कहा।

    ब्रह्माकुमारीज संस्था को समाज के साथ मिलकर काम करना चाहिए तथा विद्यार्थियों को खेल, योग, अध्यात्म, ध्यान और अन्य सकारात्मक गतिविधियों से जोड़ना चाहिए, राज्यपाल ने कहा।

    उन्होंने कहा कि ब्रह्माकुमारीज की राजयोग साधना जीवन की गुणवत्ता को बेहतर बनाने में सहायक हो सकती है। नशे के विरुद्ध लड़ाई को उन्होंने एक प्रकार का धर्मयुद्ध बताया।

    कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने कहा कि पहले शत्रु राष्ट्र हथियारों और गोला-बारूद के माध्यम से युद्ध करते थे, लेकिन आज कुछ राष्ट्र जाली नोटों तथा मादक पदार्थों की तस्करी के माध्यम से देश को अस्थिर करने का प्रयास करते हैं। ऐसे समय में परिवार संस्था को मजबूत करना आवश्यक है।

    उन्होंने कहा कि ब्रह्माकुमारीज संस्था महिलाओं के मार्गदर्शन में कार्य करने वाली एक वैश्विक संस्था है और आज यह 140 से अधिक देशों में लोगों को संस्कारित करने का कार्य कर रही है।

    उन्होंने आशा व्यक्त की कि संस्था की हजारों बहनें और भाई नशामुक्ति अभियान में महत्वपूर्ण योगदान देंगे।

    ब्रह्माकुमारीज की संयुक्त प्रशासकीय प्रमुख राजयोगिनी संतोष दीदी ने स्वागत एवं प्रास्ताविक संबोधन किया, जबकि मेडिकल विंग के प्रमुख बी. के. बनारसी लाल ने आभार व्यक्त किया।

    कार्यक्रम में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी महिला विश्वविद्यालय की कुलगुरु प्रो. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विश्वविद्यालय की कुलगुरु डॉ. हेमलता बागला, ब्रह्माकुमारीज के विभिन्न केंद्रों से आए भाई-बहन तथा विश्वविद्यालय एवं महाविद्यालयों के विद्यार्थी उपस्थित थे।

    **