20.08.2026 : राज्यपालांच्या हस्ते ६३ व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन
20.08.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ६३ व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन मुंबईतील लोकभवन येथे करण्यात आले. राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याच्या केंद्रीय समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अभिनंदन करताना राज्यपालांनी भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सागरी कर्मचाऱ्यांची (सीफेअर्स) सुरक्षितता, कल्याण, कौशल्य विकास आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील २९ विद्यापीठे आणि सागरी प्रशिक्षण संस्थांनी सहकार्य केल्यास युवकांसाठी रोजगार व करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. “विकसित सागरी क्षेत्राशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही,,” असे राज्यपालांनी नमूद केले. सागरी प्रशासनाचे महासंचालक तथा राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुनील खोपडे, उपमहासंचालक प्रवीण पाटील, उपमहासंचालक डॉ. सुधीर कोहकडे, एनएमडीसी केंद्रीय समितीचे सदस्य, सीफेअर्स संघटनांचे प्रतिनिधी तसेच सागरी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.