11.09.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके ‘मीटिंग ऑफ माईंडस’ बैठक संपन्न
11.09.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट यूथ (स्पिक-मॅके) या संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक (मिटिंग ऑफ माइंड्स) महाराष्ट्र लोकभवन येथे संपन्न झाली. राज्यपालांच्या उपस्थित बैठकीनंतर दरबार हॉल येथे झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन ऐकले. स्पिक मॅके संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर , संस्थेचे संस्थापक डॉ किरण सेठ उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, संजय कुमार यादव, सुशील कुमार जीवराजका, माया शहानी, सूचित नंदा, योगेश आंधळे, ममता भट्टाचार्य, आदी उपस्थित होते.