29.09.2026: राज्यपालांच्या हस्ते कोल्हापूर येथे रिव्हर्स बायर-सेलर मिटचे उद्घाटन
29.09.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते कोल्हापूर येथे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या रिव्हर्स बायर-सेलर मिटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती प्रेरणा देशभ्रतार तसेच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे प्रादेशिक अध्यक्ष खुशवंत जैन तसेच मान्यवर उपस्थित होते.