04.10.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत भारत जैन महामंडळातर्फे आयोजित सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस कार्यक्रम संपन्न
04.10.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत जैन महामंडळातर्फे आयोजित सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस तसेच जैन समाज रत्न अलंकरण सोहळा आज घाटकोपर मुंबई येथे संपन्न झाला.
भगवान महावीर यांनी प्रतिपादित केलेली मानवता, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह तसेच ब्रह्मचर्य ही शाश्वत जीवन मूल्ये आजही प्रासंगिक असल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, घाटकोपरचे आमदार पराग शाह, जैन आचार्य, संत, मुनी व साध्वी, भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष ख्यालीलाल तातेड, जैन रत्न सुखराज नाहर, कैलाशचंद जैन, सुरेश गोयल तसेच जैन समाजातील विविध संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.