17.11.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत उत्तराखंड व झारखंड राज्य स्थापना दिन सोहळा संपन्न
17.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे उत्तराखंड व झारखंड राज्य स्थापना दिन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन बद्रिकेदार चॅरिटेबल ट्रस्ट, गढवाल भ्रातृ मंडळ, जय फाऊंडेशन व रुद्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या कलाकारांनी उत्तराखंडच्या लोकगीत व नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, तर जय फाउंडेशन आणि रुद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने झारखंडचे लोकगीत व नृत्य असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बिश्त, विश्वस्त केशर सिंह बिश्त, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, ज्येष्ठ चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री हिमानी शिवपुरी, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गढवाली चित्रपट ‘ढोली’ चे दिग्दर्शक दिनेश भोसले व निर्माते शिशिर कृष्ण शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.