बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    23.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगीत, कला-संस्कृती, चित्रपट, सामाजिक कार्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ व्यक्तींना ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ प्रदान केला. मेघाश्रेय फाउंडेशन या संस्थेतर्फे मुंबई येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलालजी,   मेघाश्रेय फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा सिंह   यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  यावेळी राज्यपालांच्या हस्ते पार्श्वगायक हरीहरन, आयसीटीचा माजी प्रमुख प्रा. ज्येष्ठराज जोशी,   परमवीर चक्र विजेते मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव, अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी, खासदार व भोजपुरी तसेच हिंदी कलाकार रवी किशन,  ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी सामाजिक लढा देणाऱ्या लक्ष्मी अग्रवाल, शेफ संजीव कपूर,  अभिनेते अशोक सराफ, अभिनेते दिग्दर्शक सुभाष  घई, डॉ. देवांश धनगर – (संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सलीम मर्चंट (संगीत), सुजय जयराज ००(शालेय शिक्षण), जलील डी. पारकर, केदार जोशी,  अभिमन्यू सिंह (अभिनय), अहमद खान (नृत्यदिग्दर्शन),  भूमी पेडणेकर,  अभिषेक सिंह आदींना सन्मानित करण्यात आले.

    23.08.2026 समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा राज्यपाल

    समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा राज्यपाल जिष्णु देव वर्मा सर्वोत्तम नागरिक सन्मान…

    तपशील पहा
    20.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि जर्मनीच्या हॅसेन राज्याचे मुख्यमंत्री बोरिस राईन यांनी महाराष्ट्र तसेच जर्मनीतील आर्थिकदृष्ट्या आघाडीचे राज्य असलेल्या हॅसेन या राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राला संबोधित केले. 
चर्चासत्राचे आयोजन औषध शोध, औषधी निर्माण आणि औषध-संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात डिजिटल फार्मा व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पार्टेक्स एआय या संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पार्टेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंजन भारद्वाज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान, पार्टेक्स एआयचे सहसंस्थापक गौरव त्रिपाठी, पार्टेक्स एआयचे सल्लागार डॉ. संकेत खरपुडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनवरे यांच्यासह भारत व जर्मनीतील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

    20.08.2026: महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा महाराष्ट्र आणि…

    तपशील पहा
    20.08.2026:  महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ६३ व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन  मुंबईतील लोकभवन येथे करण्यात आले. राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याच्या केंद्रीय समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अभिनंदन करताना राज्यपालांनी भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सागरी कर्मचाऱ्यांची (सीफेअर्स) सुरक्षितता, कल्याण, कौशल्य विकास आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील २९ विद्यापीठे आणि सागरी प्रशिक्षण संस्थांनी सहकार्य केल्यास युवकांसाठी रोजगार व करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. सागरी प्रशासनाचे महासंचालक तथा राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुनील खोपडे, उपमहासंचालक प्रवीण पाटील, उपमहासंचालक डॉ. सुधीर कोहकडे, एनएमडीसी केंद्रीय समितीचे सदस्य, सीफेअर्स संघटनांचे प्रतिनिधी तसेच सागरी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    20.08.2026: सागरी प्रशिक्षण संस्थांनी राज्यातील विद्यापीठाशी सहकार्य करावे : राज्यपाल

    सागरी प्रशिक्षण संस्थांनी राज्यातील विद्यापीठाशी सहकार्य करावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘विकसित सागरी क्षेत्राशिवाय…

    तपशील पहा
    Maha Governor administers Sadbhavana Day Pledge to staff, officers

    20.08.2026: लोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा

    लोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी…

    तपशील पहा
    19.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे’ उद्घाटन केले. यावेळी विविध महाविद्यालयांमधून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना राज्यपालांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली तसेच ‘नशामुक्ती अभियान व्हॅन’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासकीय प्रमुख राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे प्रमुख बी. के. बनारसी लाल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, ब्रह्माकुमारीजच्या विविध केंद्रांतील बंधू व भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी मुंबईतर्फे सुरू करण्यात आलेल्या या महाअभियानाचा उद्देश युवकांमध्ये अमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती निर्माण करणे तसेच व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

    19.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत ब्रह्माकुमारींच्या व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचे उदघाटन

    राज्यपालांच्या उपस्थितीत ब्रह्माकुमारींच्या व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियानाचे उदघाटन । शेकडो विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा ब्रह्माकुमारींनी व्यसनमुक्ती अभियान…

    तपशील पहा
    19.08.2026: दिल्लीतील विविध पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे नेतृत्व मॉडर्न पब्लिक स्कूल, शालीमार बागच्या प्राचार्या डॉ. अलका कपूर यांनी केले होते.  यावेळी शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षकांच्या बदलत्या भूमिकेवर चर्चा केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि हवामान बदलामुळे वेगाने बदलणाऱ्या जगासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिकत्वाची भावना विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.

    19.08.2026: दिल्लीतील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांची भेट

    दिल्लीतील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांची भेट दिल्लीतील विविध पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आणि…

    तपशील पहा
    Governor visits Asiatic Society

    18.08.2026: राज्यपालांची एशियाटिक सोसायटीला भेट

    त्रिपुरा संबंधी ‘राजरत्नाकरम’ ग्रंथ प्रथमच पाहिला ! राज्यपालांची एशियाटिक सोसायटीला भेट; २० लाख रुपयांची देणगी…

    तपशील पहा
    18.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज ‘चांद -तारा’  या मोहम्मद अली बेग निर्मित दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलरचे लोकभवन, मुंबई येथे विशेष प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाला चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कान्स चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता.  हा चित्रपट प्रसिद्ध गायिका तारामती आणि गोलकोंडा साम्राज्याचे सुलतान अब्दुल्ला कुतुब शाह यांच्या ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. सुलतानने या महान गायिकेच्या स्मरणार्थ ‘तारामती बारादारी’ हे स्मारक उभारले होते. एका गायिकेच्या सन्मानार्थ राजाने स्मारक उभारणे हीच मुळात एक विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण कहाणी आहे, असे सांगून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने १७व्या शतकातील वातावरण आणि त्या काळचे वातावरण प्रभावीपणे उभारल्याबद्दल राज्यपालांनी निर्माता दिग्दर्शक मोहम्मद अली बेग यांचे कौतुक केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, अंजन श्रीवास्तव, रंजना श्रीवास्तव, इला अरुण, आरिफ झकारिया यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक  मान्यवर चित्रपट ट्रेलर प्रदर्शनाला उपस्थित होते.

    18.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत ‘चांद -तारा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष प्रदर्शन

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत ‘चांद -तारा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष प्रदर्शन राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    16.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा तीसरा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दहा गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. तीस पदव्युत्तर स्नातकांना प्रथम स्थान पटकावाल्यांबद्दल प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठात मुलींसाठी ४०० क्षमतेचे वसतिगृह बांधण्याची घोषणा केली. समारोहाला विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुनील भिरूड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी,  सीओईपी  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दयाराम सोनावणे व परीक्षा व मूल्यमापन संचालक यशोधरा हरिभक्त उपस्थित होते. दीक्षांत समारोहात ८८९ स्नातकांना पदवी तसेच ५८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या.

    16.08.2026 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभाला उपस्थिती

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभाला उपस्थिती अभियंत्यांनी इतरांसाठी संधी आणि…

    तपशील पहा
    Governor hosts Independence Day 'At Home' Reception in Pune

    15.08.2026: स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांकडून पुणे येथे स्वागत समारंभ

    स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांकडून पुणे येथे स्वागत समारंभ देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा
    Governor Hoists the National Flag in Pune

    15.08.2026: राज्यपालांचे पुणे येथे ध्वजारोहण

    राज्यपालांचे पुणे येथे ध्वजारोहण भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज…

    तपशील पहा

    14.08.2026: पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील जनतेला पारशी नुतन वर्षानिमित्त शुभेच्छा…

    तपशील पहा