04.09.2026 : राज्यपालांनी घेतला ९व्या उत्तरपूर्व विद्यार्थी महोत्सवात सहभाग
04.09.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे आयोजित उत्तर पूर्व राज्यातील युवक तसेच नागरिकांच्या ९व्या उत्तरपूर्व विद्यार्थी महोत्सवात सहभाग घेतला व युवकांना संबोधित केले. कार्यक्रमाचे आयोजन 'माय होम इंडिया' संस्थेतर्फे करण्यात आले. नॉर्थ ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवल हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नसून तो भारताच्या विविधतेतील एकता या संकल्पनेचे प्रतीक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ईशान्य भारतातील युवक देशभरातील विद्यापीठे, सेवा क्षेत्र, आयटी उद्योग आणि विविध व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी माय होम इंडिया संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपाटि, अरुणाचल प्रदेशचे मंत्री मामा नटुंग, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष शार्दुल शाह, माय होम इंडियाचे अध्यक्ष बलदेव राज सचदेव, संस्थापक सुनील देवधर व माय होम इंडियाच्या विश्वस्त पल्लवी देवधर उपस्थित होते.