08.08.2026: राज्यपालांची दिवंगत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली
Zoom 08.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नेरुळ, नवी मुंबई येथील कार्यालयाला भेट देऊन त्रिपुराचे दिवंगत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना आपली श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव डॉ. विजय पाटील, डॉ. शिवानी विजय पाटील तसेच इतर कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवून त्यांचे सांत्वन केले.
08.08.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma today visited the office of Dr D. Y. Patil University office at Nerul in Navi Mumbai, and paid his floral tributes to the portrait of Padma Shri late Dr. D. Y. Patil. The Governor conveyed his condolences to Dr. Vijay Patil, Chancellor of Dr D. Y. Patil University; Dr. Shivani Vijay Patil, Pro-Chancellor and other members of the Patil family.