16.10.2026: राज्यपालांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजेला भेट
Zoom 16.10.2026: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज (१६ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित ऐतिहासिक दुर्गापूजेला भेट देऊन देवीची पूजा केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थित भाविकांशी बंगाली भाषेतून संवाद साधला. बंगाल क्लबतर्फे यंदा ९१व्या दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन १९२२ मध्ये स्थापन झालेला बंगाल क्लब यंदा आपल्या स्थापनेचे १०४वे वर्ष साजरे करीत आहे. बंगाल क्लबचे अध्यक्ष जय चक्रवर्ती तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
16.10.2026: Governor Jishnu Dev Varma visited the historic Durga Puja organised by the Bengal Club and offered prayers before Goddess Durga at Shivaji Park, Mumbai. The Governor also interacted with devotees and addressed the gathering, largely comprising members of Mumbai’s Bengali-speaking community, in Bengali. Bengal Club chairman Joy Chakraborty and other office-bearers and members of the organisation were present during the Governor’s visit.