20.08.2026: राज्यपालांचे आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राला संबोधन
Zoom 20.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि जर्मनीच्या हॅसेन राज्याचे मुख्यमंत्री बोरिस राईन यांनी महाराष्ट्र तसेच जर्मनीतील आर्थिकदृष्ट्या आघाडीचे राज्य असलेल्या हॅसेन या राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राला संबोधित केले.
चर्चासत्राचे आयोजन औषध शोध, औषधी निर्माण आणि औषध-संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात डिजिटल फार्मा व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पार्टेक्स एआय या संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पार्टेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंजन भारद्वाज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान, पार्टेक्स एआयचे सहसंस्थापक गौरव त्रिपाठी, पार्टेक्स एआयचे सल्लागार डॉ. संकेत खरपुडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनवरे यांच्यासह भारत व जर्मनीतील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.
20.08.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma joined by the Minister President of the German State of Hessen Boris Rhein participated in the Maharashtra–Hessen Economic & Technology Dialogue at NSE in Mumbai. The dialogue was organised by Partex AI a digital pharma and artificial intelligence platform working in the area of drug discovery, clinical development, and asset management. Founder & CEO, Partex AI Dr. Gunjan Bhardwaj, MD & CEO of National Stock Exchange of India Ashish Kumar Chauhan, Co-Founder of Partex AI Gaurav Tripathi, Advisor of Partex AI Dr Sanket Kharpude, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, leaders of industry and business, entrepreneurs and investors from India and Germany were present.