26.11.2026: संविधान दिन: राज्यपालांकडून राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन
Zoom 26.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज संविधान दिनानिमित्त लोकभवन येथे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सर्व उपस्थितांसह वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेडडी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती व सन २०२५ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकारी यांनी राज्यपालांसमवेत प्रास्ताविकेचे वाचन केले. लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी उपस्थित होते.
26.11.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma led the reading of the Preamble to the Constitution of India along with all those present at Lok Bhavan on the occasion of Constitution Day. Additional Chief Secretary, General Administration Department, Venugopal Reddy; Secretary to the Governor, Dr. Prashant Narnaware; Joint Secretary to the Governor S. Ramamoorthy and Probationary Officers of the 2025 batch of the Indian Administrative Service joined the Governor in reading the Preamble. Officers and staff of Lok Bhavan, along with police officers and personnel deployed there, were also present.