02.11.2026 : डेन्मार्कचे व्यवसाय आणि स्पर्धात्मकता मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी एका शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट
02.11.2026 : डेन्मार्कचे व्यवसाय आणि स्पर्धात्मकता मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी आज एका शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत आणि डेन्मार्क यांच्यात हरित धोरणात्मक भागीदारी असून त्यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जीवन विज्ञान या क्षेत्रांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि डेन्मार्क यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन; आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाच्या उपस्थायी सचिव टिने नील्सन हर्ट्झ; उपमिशन प्रमुख मार्टिन एग्नुड पीटर्सन; मंत्र्यांचे विशेष सल्लागार ख्रिस्तोफर लेहमन; समुपदेशक जोसेफिन इव्हा लिली पॅलेसन हे उपस्थित होते.