02.11.2026 : लोकभवन येथे आठ राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा
02.11.2026 : एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोक भवन येथे आयोजित आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. त्यांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी. यू. एन. वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, उद्योगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे, निखत खान हेगडे, यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंह, अभिनेते पंकज बेरी, कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक, तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम, आंध्रप्रदेशच्या पथकाने भथुकम्मा लोकनृत्य, छत्तीसगडच्या पथकाने लोकनृत्य, केरळच्या पथकाने काईकोट्टिकली, पंजाबच्या पथकाने भांगडा, कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य, दिल्लीच्या पथकाने कथ्थक कलाप्रकाराचे सादरीकरण केले. तर, मध्यप्रदेश, हरियाणा, लक्षद्वीप च्या पथकांनी लोकनृत्य सादर केले. अंदमान आणि निकोबार तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, उद्योजक नवीन हेगडे, नायिका रुपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंग, अभिनेता पंकज बेरी, यशपाल शर्मा, निखत खान हेगडे, साक्षी मादोलकर, वर्मा फाउंडेशनचे श्री वर्मा, यांच्यासह षण्मुखानंद नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी, नायर असोसिएशन, बोरीवलीचे सदस्य, अय्यप्पा मंदिर, एलआयसी कॉलनीचे सदस्य, कला विद्या संकुल महाविद्यालय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मल्याळम समाज नृत्यस्वर पथक, वर्मा फाउंडेशनचे प्रतिनिधी आदींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.