02.09.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारोह संपन्न
02.09.2026: राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज एचएसएनसी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या वरळी मुंबई येथील सभागृहात संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्नातक तसेच स्नातकोत्तर पदवी धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तसेच ४५ स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारोहाला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट अनिल हरीश, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष डॉ निरंजन हिरानंदानी, विश्वस्त माया शहानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ भगवान बालानी व परीक्षा संचालक डॉ जयेश जोगळेकर उपस्थित होते.