03.11.2026: राज्यपालांच्या हस्ते ग्रामोद्योग भरारी पुरस्कार प्रदान
03.11.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळा आज लोकभवन मुंबई येथे संपन्न झाला. पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ११ यशस्वी उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून राज्यपालांनी पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे यावेळी अभिनंदन केले. कार्यक्रमाला उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, अपर जिल्हाधिकारी तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे तसेच आमंत्रित उपस्थित होते.