04.11.2026 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
04.11.2026: राज्यपाल तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचा ६७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. दीक्षांत समारंभात एकूण ६७,५५९ विद्यार्थ्यांना पदवी तसेच ३३४ संशोधकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या. आयसीटी, मुंबईचे कुलगुरु प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी दीक्षांत समारोहाला संबोधित केले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु प्रवीण वक्ते, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ बाबासाहेब डोळे तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा व इतर वैधानिक प्राधिकरणांचे सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, निमंत्रित मान्यवर, पालक तसेच स्नातक उपस्थित होते.