09.10.2026 : राज्यपालांच्या हस्ते १०३ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
09.10.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यातील १०३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. लोकभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये पोलीस पदके प्रदान करण्यात आली. पोलीस अलंकरण समारोहाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, पोलीस अधिकारी, सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.