11.09.2026: राज्यपालांकडून ‘ऑल इंडिया फ्लॅग डे फॉर द ब्लाइंड’ चे लोकार्पण
11.09.2026: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या अंध व्यक्तींच्या शिक्षण,कौशल्य प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित अंधांच्या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘फ्लॅग डे ड्राईव्ह २०26’ चे उदघाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले. या प्रसंगी एनएबी महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश्वर कलंत्री, सरचिटणीस गोपी मायूर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच नॅब चे पदाधिकारी उपस्थित होते.