14.08.2026: लोकभवन येथे लोकायुक्त संस्थेच्या सदस्यांचा शपथविधी संपन्न
14.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात लोकायुक्त संस्थेवरील न्यायिक सदस्य म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांना शपथ दिली. यावेळी राज्यपालांनी निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले यांना दुसरे न्यायिक सदस्य म्हणून तसेच सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना बिगर न्यायिक लोकायुक्त सदस्य पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सर्व सदस्यांच्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली.