17.09.2026: राज्यपालांनी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली
17.09.2026: सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली. के सी महाविद्यालयाच्या सभागृहात तसेच ओव्हल मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हात उंचावून व्यसनमुक्त राहण्याची तसेच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उदघाटन करण्यात आले. ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन एचएसएनसी विद्यापीठाने पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड व मेघाश्रय फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले होते.
यावेळी एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. अनिल हरीश, राज्यपालांचे सहसचिव एस रामामुर्ती, के सी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तेजश्री शानबाग, मेघाश्रेय फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा सिंह, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त डॉ सुमेध चव्हाण, अभिनेणते रवी दुबे व एचएसएनसी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ भगवान बालानी उपस्थित होते.