17.10.2026: राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन
17.10.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बोरिवली मुंबई येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे शारीरिक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या प्रौढ दिव्यांग व्यक्तींद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन करण्यात आले. उदघाटन समारोहाला आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक अलिना आलम व स्कायसिटी मॉलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तनू प्रसाद उपस्थित होते.