18.08.2026: राज्यपालांची एशियाटिक सोसायटीला भेट
18.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथसंग्रहालयाला भेट देऊन ग्रंथसंपदा, दुर्मिळ दस्तावेज, सोपारा येथील अवशेष, नकाशे व दुर्मिळ नाण्यांची पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समितीच्या व छाननी समितीच्या सदस्यांची ओळख करून दिली.