18.09.2026: : उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत ‘गोर्धनदास सेकसरीया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिन्थेसिस’चा कार्यक्रम संपन्न
18.09.2026: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज कैवल्यधाम योग संस्थेच्या ‘गोर्धनदास सेकसरीया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिन्थेसिस’चा अमृत महोत्सव संस्थेच्या लोणावळा येथील परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री व कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, महाविद्यालयाचे मुख्य आश्रयदाते राकेश सेकसरीया प्रामुख्याने उपस्थित होते.