21.11.2026: उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
21.11.2026: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारोहाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ एस बी मुजुमदार, कुलपती डॉ विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ रामकृष्णन रमण आणि वैद्यकीय व आरोग्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ राजीव येरवडेकर उपस्थित होते.