23.11.2026: राज्यपालांनी केले एमएसएस अप्लिकेशनचे उद्घाटन
23.11.2026: महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘एमएसएस अप्लिकेशन’चे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले. हे ऍप एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि सहाय्यकारी सेवांविषयीची माहिती एका सुलभ डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील उद्योजकांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांविषयी जागरूकता वाढण्यास, त्यांचा अधिक व्यापक प्रसार होण्यास तसेच योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी राज्यपालांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास स्वदेशी शोध संस्थान मुंबईच्या अध्यक्ष डॉ आसावरी बापट, डॉ श्रीनिवासन अय्यंगार व इतर मान्यवर उपस्थित होते.