23.11.2026: राज्यपालांनी लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित चार पुस्तकांचे केले प्रकाशन
23.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी या पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‘लोकभवन पत्रिका २०२६’ या पुस्तकात मार्च ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे दौरे, विविध कार्यक्रमांतील सहभाग, मान्यवरांच्या भेटी, कल्याणकारी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्रांसह माहिती संकलित केली आहे. ‘बँक्वेट्स ऑफ डिप्लोमसी : मेन्यूज फ्रॉम महाराष्ट्र लोकभवन १९९०-२०२६’ या पुस्तकात गेल्या ४० वर्षांतील मेजवान्यांचे मेन्यू कार्ड, उपस्थित मान्यवरांची छायाचित्रे आणि खाद्यसंस्कृती व पाहुणचाराच्या परंपरेतील बदलांचा आढावा घेतला आहे. ‘फ्रॉम क्राऊन टू रिपब्लिक : पॅन्ट्री हेरिटेज ऑफ महाराष्ट्र लोकभवन’ या पुस्तकात स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, चांदीची भांडी आणि पोर्सिलिनच्या वस्तूंचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण करण्यात आले असून, त्यांचा उपयोग व ऐतिहासिक महत्त्वही नमूद केले आहे. मोरांच्या छायाचित्रांवर आधारित पुस्तिका यामध्ये दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत टिपलेल्या लोकभवन परिसरातील मोरांच्या निवडक छायाचित्रांचा समावेश आहे.