28.10.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ हा व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम संपन्न
28.10.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ हा व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, न्या. दिलीप घुमरे, न्या. मदन गोसावी, ॲड महेश सावंत, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल वर्मा यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली. या कार्यक्रमात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू दिलीप गावित, सर्वेश कुशारे, ॲड. जयंत जायभावे, माजी आमदार निशिगंधा मोगल, डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी आणि शिवम यादव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.