29.09.2026: राज्यपालांनी कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी साधला संवाद
29.09.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासकीय विश्रामगृह येथे ही भेट झाली. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींचा भेटीमध्ये समावेश होता. याप्रसंगी मा. राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एमएसएमई (MSME) आयुक्त तथा एमएसएसआयडीसी (MSSIDC) व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले आदी उपस्थित होते.