29.09.2026: राज्यपालांनी कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेतले
29.09.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन राज्यपालांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.