30.08.2026:- राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘ग्रीन क्रुसेडर्स अँड अचिव्हर्स अवॉर्ड्स’ प्रदान
30.08.2026:- राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज पुणे येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘ग्रीन क्रुसेडर्स अँड अचिव्हर्स अवॉर्ड्स’ प्रदान करण्यात आले. भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे, गोदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला तसेच राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.
यावेळी उद्योगपती नादिर गोदरेज, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, गणेश बिडकर, अभिनेते जॅकी श्रॉफ, लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष पंकज शर्मा, गायिका कनिका कपूर, अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, गायक पवनदीप राजन, अभिनेते बोमन इराणी, गायक शान, अभिनेते राकेश बेदी आणि राहुल बोस आदींना सन्मानित करण्यात आले.